बोंबला! सेल्फ क्वारंटाइन असूनही कटींग करायला सलूनमध्ये गेला अन्....
By ऑनलाइन लोकमत | Published: July 22, 2020 05:11 PM2020-07-22T17:11:17+5:302020-07-22T17:14:55+5:30
एका प्रत्यक्षदर्शीने सांगितले की, ही व्यक्ती सलूनशिवाय १५ आणि १६ जुलैला टॉय शॉप आणि केक शॉपमध्येही गेली होती.
आयसोलेशन दरम्यानच्या अनेक विचित्र घटना सतत समोर येत आहेत. अशीच एक विचित्र घटना ब्रिटनमधून समोर आली आहे. एका व्यक्तीने सेल्फ आयसोलेशन दरम्यान केस कापण्याची चूक केली. ज्याचा त्याला ७ हजार ६०० डॉलर इतका फाइन भरावा लागला. भारतीय करन्सीत ही रक्कम ५,६७, ५३३ रूपये इतकी होते. रिपोर्टनुसार, व्यक्तीला दोन आठवडे सेल्फ आयसोलेशनमध्ये रहायचं होतं. त्याचा बाहेर पडण्यास मनाई होती.
रिपोर्टनुसार, ३ जुलैला Gareth Le Monnier ने पत्नीला भेटण्यासाठी न्यू जर्सीतील आपल्या घरून आयलॅंड ऑफ ग्वेर्नसेपर्यंत प्रवास केला. या ३७ वर्षीय व्यक्तीला १४ दिवसांसाठी क्वारंटाइन रहायचं होतं. आयसोलेशन संपण्याच्या काही दिवसांआधीच ३८ डॉलरमध्ये म्हणजे २,८३७ रूपयात केस कापायला सलूनमध्ये गेला. एका प्रत्यक्षदर्शीने सांगितले की, ही व्यक्ती सलूनशिवाय १५ आणि १६ जुलैला टॉय शॉप आणि केक शॉपमध्येही गेली होती.
बॉर्डर एजन्सीचे अधिकारी या व्यक्तीच्या घरी चौकशीसाठी पोहोचले पण तेव्हा तो घरी नव्हता. अशात व्यक्तीच्या पतीने फोनवरून अधिकाऱ्यांना सांगितले की, तो वरच्या रूममध्ये झोपला होता. पण जेव्हा कपल पुन्हा घरी परतलं तेव्हा पोलीस तिथेच उपस्थित होते. त्यांना दिसलं की, Le Monnier ने स्वत:ला कारच्या मागच्या सीटवर लपवलंय. त्यानंतर त्याला अटक करण्यात आली.
पुढे प्रकरण कोर्टात गेलं. जिथे वकीलांनी सांगितले की, क्वारंटाइन दरम्यान ही व्यक्ती बाहेर फिरल्याने आजार दुसऱ्यांनाही होऊ शकला असता. जज म्हणाले की, १४ दिवस घरात रहायचं हे समजण्यात फार काही रॉकेट सायन्स नाही. या गुन्ह्यासाठी व्यक्तीला ३,८०० रूपयांचा दंड ठोठावण्यात आला आणि सांगितलं की, पूर्ण दंड भरल्यावरच त्याला सोडलं जाईल.
धक्कादायक! मोबाइलवर दिवसरात्र चॅटींग करणं 'असं' पडलं महागात, याची कधी कल्पनाही केली नसेल!