कारमध्ये एकट्या चिमुकल्याला पाहून काच फोडली; सत्य समजताच पोलिसांनी डोक्यावर हात मारला
By ऑनलाइन लोकमत | Published: January 4, 2022 04:03 PM2022-01-04T16:03:03+5:302022-01-04T16:03:20+5:30
या दोघी गाडी साईडला लावून निघून गेल्यानंतर त्याठिकाणी २ पोलीस अधिकारी आले. त्यांनी गाडीत पाहिलं असता एक चिमुकला बालक गाडीत एकटाच असल्याचं दिसून आले.
एका गाडीत समोरच्या सीटवर बसलेल्या चिमुकल्याला पाहून पोलीस अधिकाऱ्यांनी गाडीची काच फोडली. परंतु आतमध्ये कुणीच नव्हतं. मग या पोलिसांना भास झाला का? असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. परंतु जेव्हा या पोलिसाने गाडीची काच फोडून आतमध्ये पाहिलं तेव्हा त्याला धक्काच बसला. ज्या चिमुकल्याला वाचवण्यासाठी पोलिसांनी गाडीची काच फोडली त्याचं सत्य समोर येताच त्यांना संताप अनावर झाला.
डेलीमेलच्या वृत्तानुसार, क्वीवलैंड पोलीस म्हणाले की, ते एमी मॅकक्विलेन यांच्या गाडीचं जे काही नुकसान झालंय त्याच्या रिपेरिंगचा २० हजार रुपये खर्च नुकसान भरपाई म्हणून देणार आहेत. कारण पोलिसांनी चांगल्या हेतूने जे काम केले त्याचा फटका एमीला बसला. टेसाइड थॉर्नबी येथे राहणारी ३६ वर्षीय महिला आणि तिची १० वर्षीय मुलगी गाडीने बाहेर जात होते. तेव्हा महिलेच्या मुलीने तिची डॉल गाडीत ठेवली. कारण त्यांना जवळच्या दुकानात जायचं होतं.
या दोघी गाडी साईडला लावून निघून गेल्यानंतर त्याठिकाणी २ पोलीस अधिकारी आले. त्यांनी गाडीत पाहिलं असता एक चिमुकला बालक गाडीत एकटाच असल्याचं दिसून आले. कुणीतरी गाडीत लहान मुलाला एकटं सोडून गेल्याचा संशय पोलिसांना आला. त्यामुळे तातडीने पोलिसांनी गाडीची काच फोडून त्या चिमुकल्याला बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. मात्र काच तोडून जसं या चिमुकल्याला उचललं तेव्हा पोलिसांना कळालं ती एक डॉल आहे.
गाडीत चिमुकला मुलगा असल्याचा संशय
महिलेने दावा केला की, पोलिसांच्या म्हणण्याप्रमाणे गाडीत लहान मुलगा असल्याचा संशय झाल्याने त्यांनी गाडीची काच फोडली. मी जेव्हा ते पाहिलं तेव्हा जवळ आली तेव्हा मला तुम्ही एका मुलाला गाडीत ठेवून कसं जाऊ शकता? असं पोलिसांनी विचारलं. मात्र ती केवळ एक डॉल असल्याचं महिलेने पोलिसांना सांगितले. घडलेल्या प्रकारावर उपस्थित सगळेच हैराण झाले. ही एक डॉल क्रिसमसच्या दिवशी महिलेने तिच्या मुलीला भेट म्हणून दिली होती. मात्र त्यावरुन हा प्रकार घडला. त्याचा नाहक त्रास पोलिसांना आणि महिलेलाही सहन करावा लागला.