पोट इतकं वाढलं होतं की वाटलं जुळे होतील, डिलेव्हरीनंतर बाळ पाहून सगळेच झाले हैराण...
By ऑनलाइन लोकमत | Published: July 9, 2021 12:32 PM2021-07-09T12:32:03+5:302021-07-09T12:35:53+5:30
गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डनुसार, (Guinness Book of World Records) आतापर्यंतचा सर्वात वजनी बाळ १९ जानेवारी १८७९ मध्ये ओहिओच्या सेविलेमध्ये जन्माला आलं होतं.
ब्रिटनमध्ये एका महिलेने ५.१५ किलोग्रॅम वजनाच्या बाळाला जन्म देऊन रेकॉर्ड बनवला आहे. प्रेग्नेन्सी दरम्यान ३३ वर्षीय महिलेचं पोट इतकं वाढलं होतं की, तिला वाटलं ती जुळ्या बाळांना जन्म देणार आहे. पण बाळाच्या जन्मानंतर सगळेच हैराण झाले.
गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डनुसार, (Guinness Book of World Records) आतापर्यंतचा सर्वात वजनी बाळ १९ जानेवारी १८७९ मध्ये ओहिओच्या सेविलेमध्ये जन्माला आलं होतं. ज्याचं वजन ९.९८ किलोग्रॅम होतं. त्याची उंची ७१.१२ सेंटीमीटर म्हणजे २८ इंच इतकी होती. मात्र, दुर्दैवाने जन्माच्य ११ तासांनंतर या बाळाचा मृत्यू झाला होता.
'डेली मेल'च्या वृत्तानुसार, ब्रिटनच्या वॉस्टरशायरमध्ये राहणारी ३३ वर्षीय जेड बेअरचं पोट प्रेग्नेन्सी दरम्यान इतकं वाढलं होतं की, तिला वाटलं तिला जुळे बाळ होणार आहेत. कारण तिने याआधी जुळ्या बाळांना जन्म दिला होता. पण तिने एकाच बाळाला जन्म दिला.
रिपोर्टनुसार, जेड बेअरने ५ एप्रिलला वोरस्टरशायर रॉयल हॉस्पिटलमध्ये मुलगा रॉनी-जे फ्यूट्रेल याला जन्म दिला होता. ज्याचं वजन ५.१५ किलोग्रॅम होतं. या बाळाला पाहून बेअरसोबतच डॉक्टरही हैराण झाले होते. जेड बेअऱने सांगितलं की, 'तिचा मुलगा रॉनी-जे फ्यूट्रेल इतका मोठा आहे की, नवजात बाळांचे कपडे त्याला फिट येत नाहीत. जन्मावेळी त्याला तीन ते सहा महिन्यांच्या बाळांचे कपडे घालण्यात आले होते.
सध्या बाळ आणि त्याची आई दोघेही ठीक आहेत. बेअर म्हणाली की, 'मी पूर्ण १६ तास लेबरमध्ये होते आणि तो अडकला होता. त्याच्या आकारावरून तुम्ही कल्पना करू शकता. यानंतर मला सी-सेक्शन करायचं होतं, कारण मी इतका जास्त वेळ लेबरमध्ये होते. मी फार थकलेले होते. यानंतर डॉक्टर म्हणाले की, एकदा एपिड्यूरलचा प्रयत्न करूया. मी यासाठी तयार झाले आणि जवळपास अर्ध्या तासानंतर रॉनीचा जन्म झाला'.