सामान्य दगड समजून कचऱ्यात फेकणार होती महिला, निघाला कोट्यावधी रूपयांचा हिरा
By ऑनलाइन लोकमत | Published: October 29, 2021 05:01 PM2021-10-29T17:01:19+5:302021-10-29T17:04:16+5:30
ब्रिटनमध्ये एका महिलेला घराची साफ-सफाई करताना एक अशी किंमती वस्तू मिळाली, ज्याचा अंदाज लावणंही अवघड.
घराची स्वच्छता करताना अनेकदा जुन्या काही वस्तू सापडतात, ज्या पाहिल्यावर आपल्याला आनंद मिळतो. पण ब्रिटनमध्ये (UK) एका महिलेला घराची साफ-सफाई करताना एक अशी किंमती वस्तू मिळाली, ज्याचा अंदाज लावणंही अवघड. सफाई दरम्यान या महिलेला ३४ कॅरेटचा एक हिरा सापडला. हा हिरा ती दगड समजून कचऱ्यात फेकणार होती.
किंमत समजल्यावर झाले अवाक्
'डेलीमेल' च्या वृत्तानुसार, महिलेला अजिबात अंदाज नव्हता की, जी वस्तू ती फेकणार आहे त्या हिऱ्याची किंमत २ मिलियन पाउंड म्हणजे २० कोटी रूपये आहे. नॉर्थबरलॅंडमध्ये राहणाऱ्या ७० वर्षीय महिलेने हा हिरा कार बूथ सेलमधून ज्वेलरीसोबत खरेदी केला होता. पण तिला हे माहीत नव्हतं की, याची किंमत इतकी आहे. पण जेव्हा तिला किंमत समजली ती हैराण झाली.
कॉईनच्या बरोबरीत हिऱ्याची साइज
पाउंड कॉईनपेक्षाही मोठ्या या स्टोनल हॅटन गार्डनमध्ये ठेवण्यात आलं आहे आणि पुढील महिन्यात या हिऱ्याचा लिलाव करण्यात येणार आहे. लिलावकर्त्यांनी सांगितलं की महिला त्यांच्याकडे एका बॅगमध्ये हा स्टोन घेऊन आली होती आणि ती जरा घाईत होती कारण तिला जायचं होतं. स्टोनसोबत तिला आणखीही काही ज्वेलरी विकायची होती. ज्यांची किंमत फारच कमी होती.
अद्भुत २४ कॅरेटचा हिरा
लिलावकर्त्यांनी सांगितलं की, जेव्हा आम्ही स्टोन पाहिला तर समजलं की, हा हिरा क्यूबिक जिरकोनिया आहे. जो एकप्रकारे सिंथेटिक डायमंडसारखा दिसतो. यानंतर टेस्ट मशीनमद्ये जाण्याआधी हा हिरा दोन-तीन दिवस माझ्या डेस्कवर पडून होता. पण लंडनमध्ये जेव्हा या स्टोनची टेस्ट झाली तेव्हा आमच्या पार्टनरने सांगितलं की, हा स्टोन ३४ कॅरेटपेक्षाही जास्त आहे आणि दुर्मीळ आहे.