बोंबला! सरकारचं कर्ज फेडलं नाही तर तुमच्या अंडरविअरचाही होणार लिलाव, वाचा कुठे आहे हा नियम....

By ऑनलाइन लोकमत | Published: February 18, 2021 09:43 AM2021-02-18T09:43:47+5:302021-02-18T09:49:24+5:30

यूक्रेनच्या सरकारने (Ukraine Government) अशाच लोकांना धडा शिकवण्यासाठी फारच सॉलिड नियम बनवले आहेत.

Ukraine auction rules will shock you underwear auction in Ukraine | बोंबला! सरकारचं कर्ज फेडलं नाही तर तुमच्या अंडरविअरचाही होणार लिलाव, वाचा कुठे आहे हा नियम....

बोंबला! सरकारचं कर्ज फेडलं नाही तर तुमच्या अंडरविअरचाही होणार लिलाव, वाचा कुठे आहे हा नियम....

Next

काही देशांमध्ये जनतेसाठी फारच कठोर कायदे (Strict Laws) बनवले जातात. कायद्याचं पालन न करणाऱ्यांवर सरकार कठोर कारवाई करते. कर्ज(Loan) घेऊन परत न करणाऱ्यांना तर तुम्हीही सोडत नसाल. मग सरकार त्यांना का सोडेल. काही लोक कर्ज घेऊन फरार होतात. मग बॅंकेचे लोक आणि एजन्सीचे लोक त्यांना शोधत फिरतात. यूक्रेनच्या सरकारने (Ukraine Government) अशाच लोकांना धडा शिकवण्यासाठी फारच सॉलिड नियम बनवले आहेत. कोविड-१९ (Covid-19) संक्रमणादरम्यान येथील आर्थिक स्थिती फारच बिकट झाली आहे. 

अंडरविअरचाही होणार लिलाव

बीबीसीच्या एका रिपोर्टनुसार, यूक्रेनच्या सेंट्रल सिटी Kryvyi Rih मध्ये जस्टिस मिनिस्ट्रीच्या वेबसाइटवर एका अजब लिलावाची जाहिरात टाकली आहे. यात एका अंडरविअरच्या लिलावाची (Underwear Auction)  माहिती देण्यात आली आहे. ही अंडरविअर कर्ज न फेडणाऱ्या व्यक्तीची आहे. या अंडरविअरचा लिलाव १९.४ Hryvnia म्हणजे ५० रूपयात लिलाव केला जात आहे. 

डोनेट केलं जाईल खाजगी सामान

यूक्रेनमध्ये (Ukraine) २०१५ मध्ये Setam नावाची एक प्रक्रिया सुरू करण्यात आली होती. यानुसार आतापर्यंत ३६५ मिलियन यूरोची प्रॉपर्टी विकण्यात आली आहे. जे लोक कर्ज फेडू शकत नाहीत यात त्यांचं सामान विकलं जातं. अनेकदा डिफॉल्टरचं सामान अनाथाश्रम, वृद्धाश्रम आणि शाळांना दानही केलं जातं.

प्राणी गमवावे लागतील

बीबीसीच्या या रिपोर्टनुसार, सरकार देशातील डिफॉल्टर्सच्या शेळी आणि गायींचाही लिलाव करतं. कोरोना काळात यूक्रेनमध्ये कर्ज घेणाऱ्यांची संख्या फार वाढली आहे. हे लोक आपल्यावरील कर्ज चुकवण्यात असमर्थ आहेत. २०२० मध्ये एका वयोवृद्ध महिलेच्या दोन कुत्र्यांचा लिलाव करण्यात आला होता.

Web Title: Ukraine auction rules will shock you underwear auction in Ukraine

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.