तोंडात च्युइंग गम टाकताच झाला मोठा स्फोट, विद्यार्थ्याचा वेदनादायी मृत्यू; जाणून घ्या कारण...

By ऑनलाइन लोकमत | Published: October 22, 2024 02:02 PM2024-10-22T14:02:12+5:302024-10-22T14:04:35+5:30

इथे एका ब्लादिमीर लिकोनोस नावाच्या विद्यार्थ्याचा च्युइंग गम खाताना झालेल्या स्फोटामुळे मृत्यू झाला.

Ukraine student dies after chewing gum explosion | तोंडात च्युइंग गम टाकताच झाला मोठा स्फोट, विद्यार्थ्याचा वेदनादायी मृत्यू; जाणून घ्या कारण...

तोंडात च्युइंग गम टाकताच झाला मोठा स्फोट, विद्यार्थ्याचा वेदनादायी मृत्यू; जाणून घ्या कारण...

च्युइंग गमसारख्या एखाद्या सामान्य गोष्टीने कुणाचा जीव जाऊ शकतो, याचा कुणी विचारही केला नसेल. जगभरातील कोट्यावधी लोक च्युइंग गम खातात. पण युक्रेनच्या कनोतोप शहरातून एक अशी घटना समोर आली आहे, ज्याबाबत वाचून लोक हैराण झाले आहेत. इथे एका ब्लादिमीर लिकोनोस नावाच्या विद्यार्थ्याचा च्युइंग गम खाताना झालेल्या स्फोटामुळे मृत्यू झाला.

लिकोनोस हा केमिस्ट्रीचा विद्यार्थी होता. तो विस्फोटक पदार्थांवर रिसर्च करत होता. नेहमीच आपल्या च्युइंग गमची टेस्ट वाढवण्यासाठी सायट्रिक अॅसिडचा वापर करत होता. पण यावेळी त्याने चूक केली आणि एक घातक पावडर सायट्रिक अॅसिड समजून गममध्ये मिक्स केलं. या एका चुकीमुळे त्याला आपला जीव गमवावा लागला.

मीडिया रिपोर्टनुसार, लिकोनोसने जसं च्युइंग गम खाल्लं, त्याच्या तोंडात मोठा स्फोट झाला. या स्फोटामुळे त्याचा जबडा आणि चेहरा पूर्णपणे चिरला गेला. तो इतका गंभीर जखमी झाला की, मेडिकल स्टाफ आणि पोलिसही घटनास्थळी पोहोचले. पण त्याचा जीव वाचू शकला नाही. पोलिसांनुसार, स्फोटामुळे त्याचा पूर्ण चेहरा नष्ट झाला होता. स्फोट इतका मोठा होता की, आजूबाजूचे लोकही बिथरले.

स्थानिक मीडिया रिपोर्टनुसार, लिकोनोसने चुकीने गममध्ये टीएनटीपेक्षा जास्त पटीने शक्तीशाली पावडर मिक्स केलं होतं. ब्लादिमीरच्या वेदनादायी मृत्यूवर विश्वविद्यालयाने प्रतिक्रिया दिली. त्यांनी सांगितलं की, ब्लादिमीरने केमिस्ट्रीमध्ये ग्रेड आणला होता, पण इतर विषयांमध्ये तो सरासरी होता. आम्ही हे स्पष्ट करतो की, आमच्या विश्वविद्यालयात बॉम्ब बनवणं शिकवलं जात नाही.

Web Title: Ukraine student dies after chewing gum explosion

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.