30 वर्षांपासून पुरूषांच्या प्रवेशावर बंदी, तरीही या गावातील महिला कशा होतात गर्भवती? जाणून घ्या रहस्य

By ऑनलाइन लोकमत | Published: August 6, 2022 02:05 PM2022-08-06T14:05:08+5:302022-08-06T14:05:51+5:30

Weird Facts : 15 महिलांनी मिळून पुरूषांपासून वेगळं आपलं वेगळं विश्व निर्माण करण्याचा निर्णय घेतला. या महिलांनी या गावात पुरूषांच्या प्रवेशावर बंदी घातली होती.

Umoja village entry of men is banned for 30 years then how do women of here become pregnant | 30 वर्षांपासून पुरूषांच्या प्रवेशावर बंदी, तरीही या गावातील महिला कशा होतात गर्भवती? जाणून घ्या रहस्य

30 वर्षांपासून पुरूषांच्या प्रवेशावर बंदी, तरीही या गावातील महिला कशा होतात गर्भवती? जाणून घ्या रहस्य

googlenewsNext

Weird Facts :  जगभरात अशी अनेक ठिकाणं आहेत ज्यांच्या संस्कृती आणि रहस्यांबाबत विश्वास ठेवणं थोडं अवघड जातं. आज आम्ही तुम्हाला एका अशा गावाबाबत सांगणार आहोत जेथील गोष्टी वाचल्यावर तुमचा विश्वास बसणार नाही. तुम्हाला वाचून आश्चर्य वाटेल की, या गावात गेल्या 30 वर्षांपासून पुरूषांच्या प्रवेशावर बंदी आहे. पण तरीही येथील महिला गर्भवती होतात. 

साऊथ आफ्रिकेमध्ये एका उमोजा नावाचं गाव आहे. या गावात केवळ महिलांनाच राहण्याची परवानगी आहे. समबुरू मसाई जमातीशी संबंधित महिला समान भाषा बोलतात. या गावात गेल्या 30 वर्षांपासून कोणत्याही पुरूषाने पाय ठेवलेला नाही. या गावातील महिलांनी पुरूषांना इथे येण्यावर बंदी घातली आहे. गावात सध्या एकूण 250 पेक्षा जास्त महिला राहतात. हे गाव जंगलात वसलेलं आहे. दरम्यान खूप वर्षाआधी इथे ब्रिटिश सैनिक आले होते. त्यांनी येथील महिलांवर रेप केले. त्यामुळे महिलांना पुरूषांची घृणा झाली होती.

यानंतर 15 महिलांनी मिळून पुरूषांपासून वेगळं आपलं वेगळं विश्व निर्माण करण्याचा निर्णय घेतला. या महिलांनी या गावात पुरूषांच्या प्रवेशावर बंदी घातली होती. आता सर्वांना विचार पडला असेल की, जर इथे पुरूष येतच नाही तर येथील महिला गर्भवती कशा होतात? 

तर यात कोणताही चमत्कार नाहीये. रात्रीच्या अंधारात जंगलातून लपून पुरूष या गावाच्या बाहेरील भागात येतात. यानंतर तरूण महिला त्या पुरूषांपैकी त्यांच्यासाठी पुरूष पसंत करतात. त्या त्यांच्यासोबत संबंध ठेवतात. या महिला तोपर्यंत या पुरूषांच्या संपर्कात राहतात जोपर्यंत त्या गर्भवती होत नाहीत.
जशी महिला गर्भवती होते ती त्या पुरूषासोबत सगळे संबंध तोडते. त्यानंतर बाळाचा जन्म होतो. महिला एकटीच बाळाचा सांभाळ करते. ती एकटीच मेहनत करून पैसे कमावते आणि आपलं व आपल्या बाळाचा सांभाळ करते.

महिला आपल्या बाळांना कधीच सांगत नाहीत की, त्यांचे वडील कोण आहेत. उमोजा गावात बाल विवाह, कौटुंबिक हिंसा आणि बलात्कार पीडित महिला राहतात. समबुरूच्या गवताच्या मैदानाच्या मधोमध वसलेल्या या गावात राहणाऱ्या महिलांच्या मुलांसाठी इथे शाळाही उघडण्यात आली आहे.

Web Title: Umoja village entry of men is banned for 30 years then how do women of here become pregnant

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.