अविश्वसनीय... 'या' महिला एकेकाळी पुरूष होत्या!

By ऑनलाइन लोकमत | Published: July 12, 2018 02:06 PM2018-07-12T14:06:13+5:302018-07-12T14:14:26+5:30

महिलांनी जन्म तर पुरुष म्हणून घेतलाय पण लिंग बदल करून त्या महिला झाल्यात. तुम्हीही त्यांचे फोटो पाहून यावर विश्वास ठेवणार नाहीत.

Unbelievable! 20 Gorgeous Women Were Born Men | अविश्वसनीय... 'या' महिला एकेकाळी पुरूष होत्या!

अविश्वसनीय... 'या' महिला एकेकाळी पुरूष होत्या!

googlenewsNext

शस्त्रक्रिया करुन लिंग बदलण्याचं प्रमाण अलिकडे चांगलंच वाढलं आहे. गेल्या काही वर्षात तुम्हीही लोकांच्या लिंग बदलांच्या बातम्यांवर चर्चा केली असेल. या विश्वात अशा खूप सुंदर महिला आहेत ज्यांनी जगाचं लक्ष त्यांच्याकडे वेधलं आहे. पण या महिलांसोबत एक सत्यही आहे ते म्हणजे या महिला ट्रान्सजेंडर आहेत. या महिलांनी जन्म तर पुरुष म्हणून घेतलाय पण लिंग बदल करून त्या महिला झाल्यात. तुम्हीही त्यांचे फोटो पाहून यावर विश्वास ठेवणार नाहीत.

किम पेट्रास

किम पेट्रासचं नाव जगभरात मोठ्या चर्चेत आलं होतं जेव्हा त्याने लिंग परिवर्तन करण्याचा निर्णय घेतला होता. किम ही एक जर्मन गायिका आहे. सोबतच ती गाणीही लिहिते. मुलगा म्हणून जन्माला आलेल्या या महिलेचं नाव तेव्हा किम पेटरॉस असं होतं. पण काही वर्षातच तिने स्वत:ला मुलीसारखं ठेवलं. पुढे काही वर्षांनी तिच्या आई-वडीलांनीच तिचं लिंग परिवर्तन करुन दिलं. आता की किम नावानेच ओळखली जाते. 

सिरापसॉर्न अथ्थायाकॉर्न

सिरापसॉर्न अथ्थायाकॉर्न हिला लिंग परिवर्तन केल्यानंतरही २००४ मध्ये मिस इंटरनॅशनल क्वीनचा किताब बहाल करण्यात आला होता. लिंग परिवर्तन केल्यानंतर तिने अनेक ब्युटी कॉन्टेस्टमध्ये भाग घेतला आणि त्यात विजयही मिळवला. 

डेचन सेल्डन

डेचन सेल्डन ही सुद्धा मुलगा म्हणून जन्माला आली होती. पण लिंग परिवर्तन करून ती एक महिला झाली. ही भूतानची असून एक प्रसिद्ध मॉडेल आहे. डेचनला भविष्यात मिस यूनिव्हर्सचा किताब मिळवायचा आहे. 

निक्की चावला

निक्की चावला ही मुंबईतील पहिली अशी महिला आहे जी आपल्या जेनेटिकल जीन्समुळे निराश होऊन एक महिला झाली आहे. निक्कीसाठी हा निर्णय घेणं सोपं नव्हतं. कारण ती फार जुन्या विचारांच्या घरात जन्माला आली होती. पण आज ती फॅशन विश्वात लोकप्रिय आहे. 

नोंग पॉय

नोंग पॉय ही थायलंडची असून एक प्रसिद्ध ट्रान्सजेंडर मॉडल आहे. अनेक सिनेमांमध्येही तिने अभिनेत्रीची भूमिका साकारली आहे. 

मल्लिका

भारतातील पहिली ट्रान्सवुमन म्हणून मल्लिका ही प्रसिद्ध आहे. मल्लिका ही पहिली टान्सजेंडर महिला आहे जिला ब्युटी कॉन्टेस्टमध्ये सहभाग घेण्याची संधी मिळाली होती. 

शिनाता सांघा

शिनाता सांघा ही एक परफेक्ट ब्रिटीश-इंडियन मॉडेल आहे. शिनाताने ट्रान्सजेंडर महिलांसाठी आयोजित वेगवेगळ्या ब्युटी कॉन्टेस्टमध्ये सहभाग घेतला आहे. शिनाता ही एक दक्षिण आशियातील एक प्रसिद्ध ट्रान्सजेंडर मॉडल आहे. 

केली वान डर वीर

केली वान डर वीर ही सुद्धा एत मुलगा म्हणून जन्माला आली होती. पण पुढे ती लिंग परिवर्तन करून एक स्त्री झाली. आज ती डच टेलिव्हिजनवर एक प्रसिद्ध व्यक्ती आहे. १९ वर्षांची असताना लिंग परिवर्तन केलं होतं.  

रॉबर्टा क्लोज

रॉबर्टा क्लोज ही एक पहिली अशी मॉडेल आहे जिने प्लेबॉय या मॅगझिनसाठी एक ट्रान्सजेंडर म्हणून फोटोशूट केलं होतं. आज ती जगभरात मॉडेलिंग विश्वात लोकप्रिय आहे. 

आंद्रेज पेजिक

ट्रान्सजेंडर आंद्रेज पेजिकला जगभरातील टॉप १८ सुंदर मॉडेलमध्ये स्थान आहे. 

क्लाडिया चारीज

क्लाडिया चारीज ही सुद्धा मॉडेलिंग विश्वात काम करते. तिला एका ब्युटी कॉन्टेस्टमधून काढण्यात आलं होतं कारण ती जन्माने स्त्री नव्हती. त्यातून तिने ट्रान्सजेंडरवर आंदोलनेही केली होती. 

शमीली असांका

शमीली असांका हीने सुद्धा लिंग परिवर्तन केलं आहे. त्यामुळे ती श्रीलंकेमध्ये चर्चेत आली होती. 

फ्लोरेंसिया डि ला वी

फ्लोरेंसिया डि ला वी ही सुद्धा जन्माने एक मुलगा होती. पण तुम्हाला आश्चर्य वाटेल की, तिने एका मॅगझिनसाठी संपादक म्हणून काम केलं आहे. पुढे तिने लग्नही केलं. तिला जुळे मुलं आहेत. 

कार्ला एंटोनेली

कार्ला एंटोनेली स्पेनची प्रसिद्ध मॉडेल आहे. पण तिला तिच्या देशात लिंग परिवर्तन केल्याचा फार त्रास झाल. पण ती मॉडल असण्यासोबतच स्पेनची खासदारही राहिली आहे. 

जेना टालकोवा

कॅनडाची ट्रान्सजेंडर मॉडल जेना टालकोवा हिने वेगवेगळ्या ब्युटी कॉन्टेस्टमध्ये भाग घेऊन ट्रान्सजेंडर महिलांसाठी आवाज उठवला. अनेक प्रसिद्ध ब्रॅन्डनी तिला आपला चेहरा बनवलं होतं. 

हेलन वांग

हेलन वांग ही एक चीनची मॉडल आहे. आता ती अमेरिकेत असते. हेलनने बिझनेस क्लासला मॉडेलिंगसाठी आकर्षित केले. तिने दावा केलाय की, तिने अनेक फॅशन शोमध्ये रॅम्प वॉकही केला आहे. 

चेन लिली

चेन लिलीने चीनमध्ये ती १६ वर्षांची असताना सर्जरी केली होती. आता ती चीनमधील सर्वात लोकप्रिय गायिका आणि अभिनेत्री आहे. 

हरिसू

हरिसू ही दिसायला फार सुंदर आणि आकर्षक आहे. तिचं नाव आशियातील प्रसिद्ध ट्रान्सजेंडर मॉडेलमध्ये घेतलं जातं. तिने अनेक जाहिरातींमध्येही काम केलं आहे. ती कोरियाची एक यशस्वी मॉडल आहे. त्यानंतर तिने काही सिनेमातही काम केलं आहे. 

रिमाल अली

रिमाल अली ही पाकिस्तानची ट्रान्सजेंडर मॉडल आहे. आज ती वेगवेगळ्या जाहिरातींमध्ये बघायला मिळते.
 

Web Title: Unbelievable! 20 Gorgeous Women Were Born Men

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.