काकाने भाचीसोबतच मांडला संसार, लग्न करून आल्यावर गावकऱ्यांनी जे केलं ते...
By ऑनलाइन लोकमत | Published: May 21, 2023 12:15 AM2023-05-21T00:15:41+5:302023-05-21T00:16:08+5:30
गावात पोहोचताच नवरा नवरीला धक्काच बसला अन् प्रकरण पोलिसांकडे गेलं
Uncle marries Niece, Love Marriage Story: झारखंडमधील गढवा जिल्ह्यातील माझियानव गावात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. तिथे काकांनी थेट आपल्या भाचीशीच लग्नगाठ बांधली. दोघांनी एकमेकांच्या इच्छेने हे लग्न केले आहे. पण मुलीची बाजू या लग्नामुळे नाराज आहे. मुलीच्या बाजूचे लोक मुलगा आणि त्याच्या नातेवाईकांना धमकावत असल्याचा आरोपही करत आहेत. अशा परिस्थितीत गावकऱ्यांना मात्र हे लग्न पटले नाही, त्यामुळे त्यांनी याबाबत नाराजी व्यक्त केली. त्याशिवाय त्यांना चांगलीच अद्दल घडवली.
नक्की काय घडलं?
गढवा जिल्ह्यातील माझियानव पोलीस स्टेशन हद्दीतील अमर गावातील पचेयारा टोला येथील रहिवासी असलेल्या या मुलाने आपल्या मुलीसमान मानल्या जाणाऱ्या भाचीला एकत्र आयुष्य घालवण्याचे वचन दिले आणि दोघांनी लग्न केले. दोघांनी कोर्टात नोटरीद्वारे आणि हैदर नगर देवी मंदिरात देवाला साक्षीदार मानून लग्न केले. दोघेही एकमेकांच्या दूरच्या नात्यात काका-भाची आहेत.
मुलाकडचे 'राजी', मुलीकडच्यांची नाराजी!
प्रेमी युगुलाने घरातील सदस्यांच्या इच्छेविरुद्ध घरातून पळून जाऊन लग्न केले. मुलाचे वडील रामप्रवेश पासवान आणि आई राम दुलारी देवी यांनी त्यांचे नाते मान्य केले आहे. मात्र मुलीच्या कुटुंबीयांचा या लग्नाला विरोध आहे. या लग्नसराईत दोन्ही पक्षांमध्ये समन्वय निर्माण व्हावा यासाठी प्रशासकीय अधिकारी स्थानिक पातळीवर प्रयत्न करत आहेत.
पाच वर्षांपासून प्रेमसंबंध, गावकऱ्यांनी घडवली अद्दल
नवरदेव काकाने सांगितले की, त्याचे या मुलीसोबत गेल्या पाच वर्षांपासून प्रेमसंबंध आहेत. त्यानंतर दोघांनी लग्न करून एकत्र राहण्याचा निर्णय घेतला. हा विवाह गेल्या १६ मे रोजी न्यायालयाच्या नोटरीमध्ये आणि १७ मे २०२३ रोजी पलामू जिल्ह्यातील हैदरनगर देवी धाम मंदिरात झाला. यानंतर दोघेही अमर येथील त्यांच्या घरी पोहोचले असता मुलीच्या नातेवाईकांनी व ग्रामस्थांनी या लग्नाला कडाडून विरोध केला. इतकेच नव्हे तर त्यांना अद्दल घडवण्यासाठी गावात पाऊल ठेवू दिले नाही.
प्रकरण पोहोचलं पोलीस स्टेशनमध्ये
ग्रामस्थांचा संताप पाहून मुला-मुलीच्या कुटुंबीयांनी पोलीस अधीक्षकांना संपूर्ण प्रकरणाची माहिती दिली. त्यांनी पीडित पक्षाला पोलीस ठाण्यात जाण्यास सांगितले. मुलगा आणि त्याचे कुटुंबीय घाबरले आहेत. सर्वांनी पोलीस ठाण्यात आसरा घेतला आहे. पोलिस या प्रकरणावर तोडगा काढण्यात गुंतले आहेत.