VIDEO : 600 वर्ष जुनं शहर जे आता आहे पाण्याखाली, आजही आहे सुस्थितीत

By ऑनलाइन लोकमत | Published: December 14, 2023 03:13 PM2023-12-14T15:13:46+5:302023-12-14T15:14:12+5:30

बीबीसीने सांगितलं की, यात मिंग एंड किंग राजवंशांच्या काळातील दगडांची वास्तुकला आहे.

Underwater city in China 600 year old shicheng watch video | VIDEO : 600 वर्ष जुनं शहर जे आता आहे पाण्याखाली, आजही आहे सुस्थितीत

VIDEO : 600 वर्ष जुनं शहर जे आता आहे पाण्याखाली, आजही आहे सुस्थितीत

Underwater City In China: चीनमध्ये एक असं शहर आहे जे पाणी बुडालेलं आहे. या शहरात देशातील शाही घराण्याचे अवशेष आहेत. नॅशनल जिओग्राफिकनुसार, झेजियांग प्रांतातील शिचेंग शहरात 1959 मध्ये शिनान हायड्रोइलेक्ट्रिक डॅम (Xin'an Hydroelectric Dam) साठी रस्ता बनवण्यासाठी जबरदस्ती पूर आणला गेला होता. या पुरानंतर या घटनेबाबत लोक अनेक दशकांनंतर विसरून गेले. हे शहर कियानदाओ तलावाच्या 40 मीटर झाली आहे. आता हे शहर पाणी खालील एक वेगळं विश्व बनलं आहे. नॅशनल जिओग्राफिकने सांगितलं की, पूरावेळी जवळपास 300,000 लोकांचं स्थलांतर करण्यात आलं होतं.

पाण्यात सापडलं 600 वर्ष जुनं शहर

शिचेंगबाबत लोकांमध्ये इंटरेस्ट तेव्हा वाढला जेव्हा 2001 मध्ये जेव्हा हे शहर पुन्हा शोधण्यात आलं. चीनी सरकारने हे शहर बघण्यासाठी एक टीम तयार केली की, या शहरात काय आहे. जेव्हा आतला नजारा बघितला गेला तेव्हा कमाल होता. बीबीसीने सांगितलं की, यात मिंग एंड किंग राजवंशांच्या काळातील दगडांची वास्तुकला आहे. मिंग एंड किंगने 1368 ते 1912 पर्यंत शासन केलं होतं. वू शि माउंटेनच्या जवळ असल्याने शिचेंगला नेहमीच लॉयन सिटी म्हटलं जात होतं. 

2011 मध्ये नॅशनल जिओग्राफिकने पाण्याखालच्या शहराचे काही आधी न पाहिलेले फोटो प्रकाशित केले होते. हे फोटो आणि इतर माहितीवरून समजतं की, या शहराला 5 दरवाजे होते. रूंद रस्त्यांवर 265 आर्केवे होते, ज्यात वाघ, ड्रगन, फीनिक्स आणि ऐतिहासिक शिलालेखांची संरक्षित दगडांच्या कलाकृती होत्या. काही तर 1777 मधील आहेत. पाण्याच्या खाली असूनही शहर चांगलं संरक्षित आहे. या शहराला अटलांटिस ऑफ द ईस्ट असंही म्हटलं जातं. 

Web Title: Underwater city in China 600 year old shicheng watch video

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.