वाह रे नशीब ! लॉटरीचं तिकीट हरवूनही 'तो' जिंकला १९ अब्ज रूपये, नशीबाचा असाही खेळ!
By ऑनलाइन लोकमत | Published: March 13, 2019 12:29 PM2019-03-13T12:29:33+5:302019-03-13T12:39:36+5:30
त्याचं नशीब बघा ना लॉटरीचा निकाल जाहीर होण्यापूर्वी त्याची दोन्ही लॉटरी तिकीटे हरवली. पण त्याच्या नशीबात असं होऊनही लॉटरी जिंकणं होतंच. हा तरूण रातोरात अब्जोपती झाला.
(Image Credit : PressFrom)
अमेरिकेच्या न्यूजर्सीमध्ये एका बेरोजगार व्यक्तीने आपलं नशीब आजमावण्यासाठी लॉटरीची तिकीटे खरेदी केली. मात्र त्याचं नशीब बघा ना लॉटरीचा निकाल जाहीर होण्यापूर्वी त्याची दोन्ही लॉटरी तिकीटे हरवली. पण त्याच्या नशीबात असं होऊनही लॉटरी जिंकणं होतंच. हा तरूण रातोरात अब्जोपती झाला.
एका अनोळखली व्यक्तीने त्याची हरवलेली लॉटरीची तिकीटे परत केली आणि निकार लागल्यावर हा तरूण २७३ मिलियन डॉलर म्हणजे १९ अब्ज रूपयांचा लॉटरी जॅकपॉट जिंकला. या लॉटरी जिंकणाऱ्या व्यक्तीचं नाव मायकल जे. वियर्स्की असं असून तो आता अब्जो रूपयांचा मालक झाला आहे.
वियर्स्की ने सांगितले की, लॉटरीचा निकाल जाहीर होण्याच्या एक दिवसआधी त्याने जी दोन तिकीटे विकत घेतली होती ती हरवली. त्याने सांगितले की, त्याचं लक्ष फोनवर होतं. मी पैसे काढण्यासाठी तिकीट काऊंटरवर ठेवले आणि तिथेच ठेवलेत. लॉटरीचा निकार जाहीर व्हायला केवळ एक दिवस शिल्लक होता.
वियर्स्की ने नंतर काही तास स्टोरमध्ये तिकीटांचा शोध घेतला. नंतर आता तिकीट मिळणार नाही असा विचार करून त्याने हार मानली. दुसऱ्या दिवशी तो पुन्हा त्याच स्टोरमध्ये गेला आणि तेथील कर्मचाऱ्याला हरवलेल्या तिकीटांबाबत विचारणा केली. कर्मचाऱ्याने सांगितले की, एका अनोळखी व्यक्ती तुझी दोन तिकीटे इथे देऊन गेलाय.
(Image Credit : ABC News - Go.com)
काही विचारपूस केल्यावर वियर्स्कीला लॉटरीच्या निकालाच्या दिवशी तिकीटे परत मिळाली. independent.co.uk च्या रिपोर्टनुसार, मेजदार बाब ही आहे की, लॉटरीचा निकाल जाहीर झाल्यावर दोन दिवसांपर्यत वियर्स्कीला हे माहीत नव्हतं की, तो १९ अब्ज रूपये जिंकला आहे. त्याच्या आईने जेव्हा लॉटरीची चर्चा केली तेव्हा त्याने लॉटरी अॅप पाहिलं आणि त्याला कळालं की तो श्रीमंत झालाय.
वियर्स्की सांगतो की, तो गेल्या वर्षांपासून बेरोजगार आहे. सामान्यपणे दर आठवड्याला २० डॉलर तो लॉटरीवर खर्च करतो. गेल्यावर्षीच त्याचा घटस्फोटही झाला. आता या लॉटरीच्या पैशांनी तो नवीन जीवनाला सुरूवात करणार आहे.