रेल्वेच्या इंजिनावरील WAG, WAP सारख्या कोड्सचा अर्थ काय असतो?
By ऑनलाइन लोकमत | Published: December 19, 2022 02:11 PM2022-12-19T14:11:10+5:302022-12-19T14:11:27+5:30
Unique Code On Train Engines Meaning : रेल्वेच्या इंजिनावर समोर काही यूनिक कोड असतात. यावर काही अल्फाबेट लिहिलेले असतात. जसे की, WAG, WAP, WDM इत्यादी. पण तुम्ही कधी या अल्फाबेटचा अर्थ काय असतो याचा विचार केला का
Unique Code WAG WAP WDM On Train Engines Meaning : तुम्ही कधीना कधी रेल्वेत प्रवास केला असेलच. अशात तुम्ही हेही बघितलं असेल की, रेल्वेच्या इंजिनावर समोर काही यूनिक कोड असतात. यावर काही अल्फाबेट लिहिलेले असतात. जसे की, WAG, WAP, WDM इत्यादी. पण तुम्ही कधी या अल्फाबेटचा अर्थ काय असतो याचा विचार केला का? नसेल केला तर चला जाणून घेऊ काय होतो यांचा अर्थ...
मुळात या अल्फाबेट्सचा अर्थ वेगवेगळा असतो. रेल्वे लाइन तीन प्रकारच्या असतात. मोठी लाइन, छोटी लाइन आणि त्याहून लहान लाईन. रेल्वेच्या भाषेत मोठ्या लाइनला ब्रॉड गेज, छोट्या लाइनला मीटर गेज आणि त्याहून लहान लाइनला नॅरो गेज म्हटलं जातं.
नॅरो गेज सामान्यपणे डोंगराळ भागात असते. यातील ब्रॉड गेजसाठी W, मीटर गेजसाठी Y, नॅरो गेजसाठी Z चा वापर केला जातो. पहिलं अक्षर याचीच माहिती देतं. तर दुसरं अक्षर हे सांगतं की, इंजिन कोणत्या गेजचा वापर करून चालत आहे.
म्हणजे A आणि D इंजिनच्या शक्तीचा सोर्स सांगितला जातो. म्हणजे जर इंजिन डीझलचं असेल तर D अक्षराच वापर होतो. तेच A हे दर्शवतो की, इंजिनसाठी इलेक्ट्रिसिटी पावरचा वापर केला जातो.
पुढे जाऊन या कोड्समध्ये ‘P,’ G, ‘M,’ आणि ‘S’ सारख्या अक्षरांचाही वापर होतो. हे अक्षर दर्शवतात की, रेल्वे कशाप्रकारची आहे. उदाहरणार्थ P पॅसेंजर रेल्वेसाठी आणि G मालगाडीसाठी. तर M चा वापर मिश्रित उद्देश्यांसाठी(पॅंसेंजर आणि मालगाड़ी) साठी केला जातो आणि S शंटिंगसाठी वापरतात.
रेल्वे इंजिनावर लिहिलेला कोड WAG चा अर्थ वाइड गेज ट्रॅक होतो. हे एक एसी मोटिव पॉवर इंजिन आहे. जर इंजिनवर WAP असा कोड लिहिला असेल तर याचा अर्थ होतो की, AC च्या पॉवरवर वाइड गेज रूळांवर चालणारी पॅसेंजर रेल्वे.
तसेच जर WAM लिहिलेलं असेल तर याचा अर्थ हे एसी मोटिव पॉवर इंजिन आहे. हे वाइड गेजवर चालतं आणि याचा वापर प्रवासी आणि मालगाडी दोन्ही रेल्वे खेचण्यासाठी केला जातो. जर रेल्वेच्या इंजिनावर WAS लिहिलेलं असेल तर हे एसी मोटिव पॉवर इंजिन आहे आणि हे वाइड गेज ट्रॅकवर चालतं. याचा वापर शंटिंगसाठी केला जातो.