जुळ्या मुलांच्या जन्माचा अनोखा योगायोग; अवघ्या १५ मिनिटांनी बदललं दोघांचं Birth Year
By ऑनलाइन लोकमत | Published: January 4, 2022 09:08 AM2022-01-04T09:08:10+5:302022-01-04T09:13:56+5:30
या अनोख्या योगायोगामुळे आई-वडिलांसह डॉक्टरही हैराण झाले आहेत. या जुळ्या मुलांचा वाढदिवस वेगवेगळ्या दिवशी साजरा होणार आहे.
जुळी मुलं म्हटलं की, त्यांचे वय, वाढदिवस एकाच दिवशी साजरा होतो. मात्र अमेरिकेच्या कॅलिफोर्निया येथे जुळ्या मुलांचा वाढदिवस वेगवेगळ्या दिवशी साजरा करण्यात येणार आहे. ही खूप दुर्मिळ घटना आहे जेव्हा जुळ्या मुलांचा जन्म अशाप्रकारे काही अंतराच्या गॅपने झाल्यामुळे घडलं आहे. आता हा नक्की काय प्रकार आहे? हे जाणून घेऊया
नवीन वर्ष येण्याच्या १५ मिनिटं आधी झाला पहिल्या मुलाचा जन्म
People च्या वृत्तानुसार, ३१ डिसेंबर शुक्रवारी संध्याकाळी फातिमा मेड्रिगल आणि रॉबर्ट रुजिलो यांच्या घरी पाळणा हलला. रात्री ११ वाजून ४५ मिनिटांनी या महिलेने एका मुलाला जन्म दिला. वर्षा अखेरीस फातिमा आणि रॉबर्ट यांच्या आनंदाला पारावार उरला नाही. पहिल्या मुलाच्या आनंदात असलेल्या रॉबर्ट आणि फातिमाला १५ मिनिटांनंतर रात्री १२ वाजून १ मिनिटांनी मुलगी झाली. तोपर्यंत २०२२ या नवीन वर्षाला सुरुवात झाली होती. या मुलांचे नाव अलफ्रेडो आणि आयलिन असं ठेवण्यात आले आहे.
या अनोख्या योगायोगामुळे आई-वडिलांसह डॉक्टरही हैराण झाले आहेत. या जुळ्या मुलांचा वाढदिवस वेगवेगळ्या दिवशी साजरा होणार आहे. इतकचं नाही तर दोघांच्या जन्मदिवसात १ वर्षाचं अंतर राहणार आहे. मुलांना वाढदिवस युनिक असल्याने आई वडीलही फार उत्साहित आहेत. सेंटर्स फॉर डिसीज एँड प्रिवेंशननुसार, अमेरिकेत दरवर्षी २० हजार जुळी मुलं जन्माला येतात मात्र केवळ ३ टक्के प्रकरणातच अशाप्रकारे योगायोग पाहायला मिळतो. याबाबत नेतिविदेद मेडिकल सेंटरनेही आश्चर्य व्यक्त केले आहे.