भारतातील एक असं रेल्वे स्टेशन ज्याला नावच नाही, कारण वाचून कपाळावर मारून घ्याल हात!
By ऑनलाइन लोकमत | Published: February 20, 2020 04:30 PM2020-02-20T16:30:45+5:302020-02-20T16:37:20+5:30
एखादं रेल्वे स्टेशन नावाविना कसं असू शकतं? असा प्रश्न तुम्हाला पडू शकतो. पण हे खरं आहे.
(Image Credit : trendingviralpost.com)
भारतीय रेल्वे आशियातील दुसरी सर्वात मोठी रेल्वे सेवा आहे. इतकेच नाही तर एकल सरकारी स्वामित्वाबाबतही भारतीय रेल्वे जगातील चौथी सर्वात मोठी रेल्वे सेवा आहे. भारतात एकूण ८००० रेल्वे स्थानके आहेत. यातील कितीतरी रेल्वे स्थानके लोकप्रिय आहेत. पण आज आम्ही तुम्हाला एका अशा अनोख्या रेल्वे स्टेशनबाबत सांगणार आहोत ज्याला नावच नाहीय.
(Image Credit : thehindu.com)
एखादं रेल्वे स्टेशन नावाविना कसं असू शकतं? असा प्रश्न तुम्हाला पडू शकतो. पण हे खरं आहे. हे रेल्वे स्टेशन पश्चिम बंगालमध्ये असून त्याला नावच नाही. हे रेल्वे स्टेशन पश्चिम बंगालच्या बर्धमानपासून जवळपास ३५ किलोमीटर अंतरावर आहे.
(Image Credit : indiatvnews.com)(सांकेतिक छायाचित्र)
बांकुरा-मेसग्राम रेल्वे लाइनवर असलेले हे रेल्वे स्टेशन रैना आणि रैनागढ या दोन गावांच्या मधे आहे. सुरुवातीला या गावाल रैनागढ नावाने ओळखलं जात होतं. रैना गावातील लोकांना हे मान्य नव्हतं. कारण या रेल्वे स्टेशनच्या इमारतीचं बांधकाम रैना गावातील जमिनीवर करण्यात आलं होतं. रैना गावातील लोकांचं असं मत होतं की, या स्टेशनचं नाव रैनागढ नाही तर रैना असायला हवं.
या गोष्टीवरून दोन्ही गावांमध्ये भांडण सुरू झालं. आता हे स्टेशन नावावरून सुरू झालेलं भांडण रेल्वे बोर्डापर्यंत पोहोचलं आहे. भांडणानंतर भारतीय रेल्वेने इथे लावण्यात आलेले सगळेच साइन बोर्ड हटवले आहेत, त्यामुळे बाहेरून येणाऱ्या प्रवाशांना अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. मात्र, तिकीट अजूनही जुन्या रैनागढ या नावानेच दिलं जातं.