काय सांगता! इथे एकाच झाडाला येतात ४० प्रकारची फळे, जाणून घ्या खासियत
By ऑनलाइन लोकमत | Published: June 13, 2019 01:47 PM2019-06-13T13:47:06+5:302019-06-13T13:53:31+5:30
सामान्यपणे असं मानलं जातं की, एका झाडावर एकाच प्रकारचं फळ लागू शकतं. पण असं अजिबात नाहीये. जगात एक असंही ठिकाण आहे जेथील झाडावर ४० प्रकारचे फळं लागतात.
सामान्यपणे असं मानलं जातं की, एका झाडावर एकाच प्रकारचं फळ लागू शकतं. पण असं अजिबात नाहीये. जगात एक असंही ठिकाण आहे जेथील झाडावर ४० प्रकारचे फळं लागतात. खरंतर यावर विश्वास ठेवणं थोडं कठीण नक्कीच आहे, पण हे सत्य आहे.
अमेरिकेतील एका व्हिज्युअल आर्ट्च्या प्राध्यापकांनी एक अद्भुत झाड तयार केलं आहे. ज्यावर ४० प्रकारची फळे लागतात. हे अनोखं झाड ट्री ऑफ ४० नावाने ओळखलं जातं. या झाडावर बोरं, चेरी, नेक्टराइन, खुबानी अशी कितीतरी फळे लागतात. जशी या अनोख्या झाडाची संकल्पना आश्चर्याचा धक्का देणारी आहे, तशीच याची किंमतही धक्का देणारी आहे. या झाडीची किंमत १९ लाख रूपये इतकी आहे.
अमेरिकेतील सेराक्यूज युनिव्हर्सिटीमध्ये व्हिज्युअळ आर्ट्सचे प्राध्यापक सॅम वॉन ऐकेन हे या अनोख्या झाडाचे जनक आहेत. हे झाड विकसित करण्यासाठी त्यांनी विज्ञानाची मदत घेतली. त्यांनी या झाडावर २००८ मध्ये काम करण्यास सुरूवात केली होती. त्यांना ही संकल्पना तेव्हा सुचली जेव्हा त्यांनी न्यूयॉर्क येथील कृषी प्रदर्शनात एका बाग पाहिली होती. यात २०० प्रकारची बोरीची आणि खुबानीची झाडे होती.
ही बाग फंड कमी असल्याकारणाने बंद होणार होता. ज्यात अनेक प्राचीन आणि दुर्मिळ प्रजातींची झाडे होती. प्राध्यापक वॉन यांचा जन्म एका शेतकरी कुंटुंबात झाला होता, त्यामुळे त्यांची आवड शेतीत होतीच. त्यांनी ही बाग भाड्याने घेतली आणि ग्राफ्टिंग टेक्नीकच्या मदतीने त्यांनी ट्री ऑफ ४० हे अद्भुत झाड उगवण्याचा कारनामा केला.
(Image Credit : Growing Produce)
ग्राफ्टिंग टेक्नीकच्या माध्यमातून झाड तयार करण्यासाठी हिवाळ्यात झाडाची एक फांदी कळीसोबत तोडली जाते. नंतर ही फांदी मुख्य झाडात छिद्र करून लावली जाते. तसेच त्यावर पोषक तत्त्वांचा लेप लावून हिवाळा जाईपर्यंत त्यावर पट्टी बांधली जाते. नंतर ही फांदी मुख्य झाडाशी जुळली जाते आणि त्यावर फळं-फुलं उगवू लागतात.