ऐकावं ते नवलच! एकाच झाड्याला येतात १२१ प्रकारचे आंबे; पाहणाऱ्यांना आश्चर्याचा धक्का
By ऑनलाइन लोकमत | Published: July 1, 2021 03:27 PM2021-07-01T15:27:16+5:302021-07-01T15:27:51+5:30
१० वर्षांपूर्वी कलम करण्यात आलेल्या आंब्याच्या झाडाची आता पंचक्रोशीत चर्चा
सहारनपूर: तब्बल २ लाख ७० हजारांचा असलेला एक आंबा गेल्या महिन्यात चर्चेत होता. अतिशय मौल्यवान आंब्याच्या सुरक्षेसाठी कुत्रे आणि सुरक्षा रक्षक तैनात करण्यात आल्याची मध्य प्रदेशातून समोर आली होती. यानंतर आता उत्तर प्रदेशच्या सहारनपूरमधील आंब्याचं एक झाड चर्चेत आलं आहे. या आंब्याला एक, दोन नव्हे, तर तब्बल १२१ प्रकारचे आंबे लागले आहेत. या आंब्याची आता सर्वत्र चर्चा सुरू आहे. जवळपास १० वर्षांच्या मेहनतीमधून आंब्याचं अनोखं झाडं तयार झालं आहे.
सहारनपूरच्या मधोमध कंपनी बाग परिसर आहे. या बागेत विविध प्रकारची झाडं आहेत. या मुघलकालीन बागेत विविध शोध आणि बागकामेचं प्रशिक्षण देण्यात येतं. याच बागेत एक अनोखं झाडं आहे. या झाडाला १२१ प्रकारचे आंबे येतात. १० वर्षांपूर्वी या आंब्याच्या फांद्या कलम करण्यात आल्या. तिथे जोडण्यात आलेल्या फांद्यांना आता आंबे येऊ लागले आहेत.
सहारनपूर आंब्याच्या नव्या नव्या प्रजातींचा शोध लागला आहे. जवळपास १० वर्षांपूर्वी कंपनी बागेत असलेल्या उद्यान प्रयोग आणि प्रशिक्षण केंद्राचे तत्कालीन संयुक्त संचालक राजेश प्रसाद यांनी आंब्याच्या एका झाडावर १२१ फांद्या लावल्या. या आंब्या विविध प्रजातीच्या आंब्याच्या होत्या. दहा वर्ष वयोमान असलेल्या आंब्याच्या झाडाची त्यांनी या प्रयोगासाठी निवड केली. या आंब्याच्या झाडाच्या देखभालीसाठी एक स्वतंत्र नर्सरी इंचार्ज नियुक्त करण्यात आला.
एकाच झाडावर तब्बल १२१ प्रकारचे आंबे
कंपनी बागेतील आंब्याच्या झाडावर दशहरी, चौंसा, लंगडा, रामकेला, आम्रपाली, सहारनपूर अरुण, सहारणपूर वरुण, सहारणपूर सौरभ, सहारणपूर गौरव, सहारणपूर राजीव, लखनऊ सफेदा, टॉमी एट किंग्स, पूसा सूर्या, सेन्सेशन, रटोल, कलमी मालदा, स्मिथ, मँगीफेरा जालोनिया, गोला बुलंदशहर, लरन्कू, एलआर स्पेशल, आलमपूर बेनिशा, असौजिया देवबंद यांच्यासह आणखी विविध प्रकारचे आंबे लागतात.