एक अनोखं गाव जिथे एका देशात जेवतात लोक आणि दुसऱ्या देशात झोपतात!

By ऑनलाइन लोकमत | Published: July 18, 2023 04:42 PM2023-07-18T16:42:57+5:302023-07-18T16:45:03+5:30

भारतातील या अनोख्या गावाचं नाव लोंगवा आहे. या गावाचा अर्धा भाग भारतात आहे तर अर्धा भाग म्यानमारमध्ये आहे.

Unique village people eat in one country and sleep in another country | एक अनोखं गाव जिथे एका देशात जेवतात लोक आणि दुसऱ्या देशात झोपतात!

एक अनोखं गाव जिथे एका देशात जेवतात लोक आणि दुसऱ्या देशात झोपतात!

googlenewsNext

जगभरात काही अशा अशा गोष्टी असतात ज्यांवर सहज विश्वास बसत नाही. अनेक देशांच्या सीमाही अनोख्या असतात. आता हेच बघा ना भारतातील एक गाव असं ज्या गावातील सरपंच जेवण एका देशात करतो आणि झोपायला दुसऱ्या देशात जातो. चला जाणून घेऊ या अनोख्या गावाबाबत.

भारतातील या अनोख्या गावाचं नाव लोंगवा आहे. या गावाचा अर्धा भाग भारतात आहे तर अर्धा भाग म्यानमारमध्ये आहे. या गावाची आणखी एक बाब म्हणजे पूर्वीपासून इथे राहणाऱ्या लोकांमध्ये दुश्मनाचं डोकं धडापासून वेगळं करण्याची परंपरा चालू होती. ती आता बंद करण्यात आली आहे.

भारतातील शेवटचं गाव

लोंगवा नागालॅंडच्या मोन जिल्ह्यात घनदाट जंगलात म्यानमारच्या सीमेजवळील भारताचं शेवटचं गाव आहे. इथे कोंयाक आदिवासी लोक राहतात. आपल्या कबील्याची सत्ता आणि जमिनीवर ताबा मिळवण्यासाठी हे लोक शेजारच्या गावांसोबत भांडणं करत होते.

1940 मध्ये पहिला कोंयाक आदिवासी आपल्या कबील्यासाठी आणि त्यांच्या जमिनीवर ताबा मिळवण्यासाठी दुसऱ्या लोकांची मुंडकी कापत होते. या लोकांना शिकारीही म्हटलं जातं. यांची गावे जास्तकरून डोंगरांच्या टोकावर होते. जेणेकरून विरोधकांवर लक्ष ठेवता यावं. 

अधिकाऱ्यांचा घोळ

असेही म्हटले जाते की, हे गाव दोन भागात कसं विभागण्यात यावं? याबाबत काही सुचलं नसल्याने अधिकाऱ्यांनी ठरवलं की, गावाच्या मधोमध एक रेषा आखली जावी. पण कोंयाकवर याचा काहीही फरक पडला नाही. सीमेच्या पीलरवर एकीकडे बर्मीज(म्यानमारची भाषा) आणि दुसरीकडे हिंदीमध्ये मेसेज लिहिले आहेत.

दोन्ही देशांची नागरिकता

असे म्हणतात की, कोंयाक आदिवास्यांमध्ये गावाचा प्रमुख अशी प्रथा चालते. ही व्यक्ती गावाची प्रमुख असते. त्यांना एकापेक्षा जास्त पत्नी करण्याची सूटही आहे. आता जी व्यक्ती या गावाची प्रमुख आहे, त्याला ६० पत्नी आहेत. भारत आणि म्यानमारची सीमा या प्रमुखाच्या घराच्या मधून जाते. त्यामुळे म्हटलं जातं की, येथील प्रमुख भारतात खातो आणि झोपतो म्यानमारमध्ये. या गावातील लोकांनी भारत आणि म्यानमार अशी दोन्ही देशाची नागरिकता मिळाली आहे. हे लोक पासपोर्ट आणि विसाशिवायही दोन्ही देशात प्रवास करू शकतात. 

Web Title: Unique village people eat in one country and sleep in another country

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.