महिलेने पतीला दिली ती गर्भवती असल्याची आनंदाची बातमी, पण समजताच पती करू लागला उलट्या....
By ऑनलाइन लोकमत | Published: May 10, 2023 01:30 PM2023-05-10T13:30:51+5:302023-05-10T13:35:40+5:30
जॅसमीन चिशवेलने तिची वापरलेली प्रेग्नेंसी टेस्ट किट आपल्या पतीसमोर दाखवली त्याचा लोकांना राग आला आहे. टिकटॉकवर शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये महिलेने आपला पती मेवरिक याला एक आईस्क्रीम दिली.
एखादी महिला गर्भवती झाली तर तिच्यासोबतच तिच्या पतीसाठीही हा आनंदाचा क्षण असतो. अशात आपल्या लाईफ पार्टनरला ही बातमी दिल्यावर त्यांची प्रतिक्रिया बघणं खास क्षण असतो. कॅलिफोर्नियाच्या लॉस एंजलिसमधील महिलेने सुद्धा असंच केलं आणि आपल्या पतीला खास अंदाजात सांगितलं की, तो पिता होणार आहे. पण बऱ्याच लोकांना तिचा हा अंदाज आवडला नाही.
जॅसमीन चिशवेलने तिची वापरलेली प्रेग्नेंसी टेस्ट किट आपल्या पतीसमोर दाखवली त्याचा लोकांना राग आला आहे. टिकटॉकवर शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये महिलेने आपला पती मेवरिक याला एक आईस्क्रीम दिली. मेवरिकने आईस्क्रीम खाणंही सुरू केलं. तो आईस्क्रीममध्ये एक वेफरसारखी दिसणारी गोष्ट उचलून चाटूही लागतो.
त्यानंतर जेव्हा तो बारकाईने बघतो तेव्हा त्याला ती एक वापरलेली प्रेग्नेंसी टेस्ट किट असते. मेवरिच्या लक्षात येताच तो उलटी करू लागतो. पण नंतर प्रेग्नेंसी किटमध्ये पॉझिटिव्ह रिपोर्ट बघून तो आनंदी होतो.
प्रेग्नेंसी किटमध्य रिझल्ट बघण्यासाठी लघवीचा वापर केला जातो. अशा प्रकारे आईस्क्रीममध्ये टाकून आपल्या पतीला खायला देण्याची आयडिया लोकांना अजिबात आवडली नाही.
व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लोकांनी लिहिलं की, विश्वास बसत नाही की, त्याने किट चाटली. लोकांच्या या व्हिडिओवर खूप कमेंट आल्या आहेत. एकाने लिहिलं की, तू त्याला अशी वस्तू खायला दिली ज्यावर तू तुझी लघवी टाकली होती. कमीत कमी ती किट प्लास्टिकमध्ये टाकून द्यायची असती. एकाने लिहिलं की, शुभेच्छा...पण खाण्यात का टाकली?