नशीब असावं तर श्रीरामसारखं; एका क्षणात ३१ लाखांनी बँक बॅलेन्स वाढला

By ऑनलाइन लोकमत | Published: January 6, 2022 03:24 PM2022-01-06T15:24:59+5:302022-01-06T15:25:13+5:30

मागील १६ वर्षापासून तो दुबईत राहतो. यापुढेही ड्रॉमध्ये भाग घेणार असल्याचं श्रीरामनं सांगितले

United Arab Emirates Shriram Naik Won Lottery Twice In The Same Month Total Of 31 Lakh Rupees | नशीब असावं तर श्रीरामसारखं; एका क्षणात ३१ लाखांनी बँक बॅलेन्स वाढला

नशीब असावं तर श्रीरामसारखं; एका क्षणात ३१ लाखांनी बँक बॅलेन्स वाढला

Next

दुबई – १६ वर्षापासून दुबईत राहणाऱ्या श्रीरामचं या महिन्यात नशीब फळफळलं आहे. एकाच महिन्यात दोनदा लॉटरी लागल्यानं रातोरात श्रीराम श्रीमंत झाला आहे. काही क्षणातच एकूण ३१ लाख रुपयांनी त्याचा बँक बॅलेन्स वाढला आहे.

एकाच महिन्यात दोनदा लॉटरी

श्रीरामला एकाच महिन्यात दोन वेगवेगळ्या लॉटरीमध्ये एकूण ३१ लाख रुपये बक्षीस मिळालं आहे. मागील १६ वर्षापासून तो दुबईत राहतो. यापुढेही ड्रॉमध्ये भाग घेणार असल्याचं श्रीरामनं सांगितले. जोपर्यंत प्रयत्न करत नाही तोवर काय साध्य होईल? श्रीरामशिवाय लेबनान आणि स्लोवेनियाच्या दोन जणांना १५ लाख ७५ हजार ३२ रुपये अमीरात ड्रॉ जिंकला आहे.

“मी स्तब्ध, माझ्याकडे शब्द नाहीत”

खलीज टाइम्सशी श्रीराम शांता नाईक यांनी संवाद साधला, ते म्हणाले की, मी स्तब्ध आहे, माझ्याकडे काही शब्द नाहीत. मला विश्वास बसत नाही की मी जे नंबर निवडले होते ते एकाच महिन्यात ड्रॉमध्ये दोनदा विनर म्हणून येतील. हा विजय खूप आश्चर्यचकीत करणारा आहे. जमा झालेले पैसे विविध शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्याची योजना बनवत आहे अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.

लेबनानमधील एका व्यक्तीचं नशीब चमकलं

मागील ३० वर्षापासून संयुक्त अरब अमीरात राहणारे लेबनानचे हबीबने रैफल ड्रॉमध्ये भाग घेतला होता. मुलाची इच्छा पूर्ण करण्यासाठी मी तिकीट खरेदी केले. माझा मुलगा सारखा मेसेज करुन मला तिकीट घेण्यासाठी मागे लागला होता. त्यामुळे मी अमीरातच्या ड्रॉ वेबसाइटवर गेलो आणि तिने नंबर निवडला आणि ७७७७७ दिनार म्हणजे जवळपास १६ लाख रुपये लॉटरीतून जिंकले.

Web Title: United Arab Emirates Shriram Naik Won Lottery Twice In The Same Month Total Of 31 Lakh Rupees

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.