जेवण अन् नाश्त्यासाठी रोज खात होता कुत्र्याचे अन्न, कारण समजल्यावर वाटेल किळस
By ऑनलाइन लोकमत | Published: June 24, 2022 04:41 PM2022-06-24T16:41:24+5:302022-06-24T16:53:09+5:30
प्राणी खात असतील ते पदार्थ माणूस खाऊच शकतो असं नाही. असं असताना एक तरुण मात्र फक्त डॉग फूडच खात राहिला (Man Eats Dog Food). हे शॉकिंग प्रकरण सध्या चर्चेत आलं आहे.
प्राणी हा एक जीवच आहे. त्यामुळे त्यांच्या मुलभूत गरजाही जवळपास माणसांसारख्याच आहेत. माणसांप्रमाणेच प्राण्यांनाही अन्न, पाण्याची गरज असते. काही लोक आपल्याप्रमाणे प्राण्यांनाही वस्त्र, निवारा पुरवतात. आपल्या घरात प्राणी पाळून त्यांना सर्व सुखसुविधा देतात. घरातील सदस्यांप्रमाणेच वागवतात. पण काही झालं तरी एका बाबतीत मात्र माणूस आणि प्राण्याची बरोबरी होऊ शकत नाही, ती म्हणजे खाणं. प्राणी खात असतील ते पदार्थ माणूस खाऊच शकतो असं नाही. असं असताना एक तरुण मात्र फक्त डॉग फूडच खात राहिला (Man Eats Dog Food). हे शॉकिंग प्रकरण सध्या चर्चेत आलं आहे.
युनिव्हर्सिटीत शिकणाऱ्या एका विद्यार्थ्याने आपल्या खाण्याच्या सवयीबाबत सोशल मीडियावर पोस्ट केली आहे. त्याने आपल्या खाण्याबाबत धक्कादायक खुलासा केला आहे. आपण डॉग फूड खात असल्याचं या तरुणाने सांगितलं आहे. तरुणाने सांगितल्यानुसार दिवसातून तीन वेळा तो डॉग फूड खातो. नाश्ता, जेवण आणि चहासोबतही तो डॉग फूडच खातो.
सुरुवातीला त्याच्या रूममेट्सनाही याची माहिती नव्हती. पण जेव्हा त्याच्या खोलीत त्यांना रेशनऐवजी डॉग फूड्स पॅकेट्स दिसले तेव्हा त्यांना संशय वाटला. शेवटी त्या तरुणाने आपल्या मित्रासमोर त्याचा खुलासा केला तेव्हा सर्वांना धक्का बसला. दररोज डॉग फूड खाल्ल्याने त्याच्या आरोग्यावर काही दुष्परिणाम झाला नाही का, अशी विचारणाही त्या मित्राने केली. मुलाने सांगितलं की त्याच्याकडे फार पैसे नसल्याने त्याने असं केलं. शेवटी त्याला आता डॉग फूड खाण्याची सवयच झाली आहे.
या पोस्टवर बऱ्याच कमेंट आल्या आहेत. माणसांसाठी असलेलं खाद्यपदार्थ डॉग फूडपेक्षा फार फार तर किती महाग असेल?, असा सवाल बहुतेक युझर्सनी केला आहे. काही युझर्सनी त्याला फूड बँकेत जाण्याच सल्ला दिला आहे. डॉग फूडमध्ये असे पदार्थ असतात जे माणसांच्या पचनासाठी योग्य नाहीत. स्वस्त डॉग फूडमध्ये तर हाडं आणि इतर काही पदार्थांची पूड करून टाकली जाते, जी माणसांना नुकसान पोहोचवू शकते, असंही काही युझर्सनी म्हटलं आहे.