जगातल्या 'या' पाच ठिकाणांवरील धूळ तर काढली, पण यांचा इतिहास आजही आहे रहस्य...

By ऑनलाइन लोकमत | Published: November 28, 2019 01:34 PM2019-11-28T13:34:04+5:302019-11-28T13:34:43+5:30

पुरातत्व विभागाकडून सतत काहीतर शोध घेतला जात असतो. धुळीत आणि पाण्यात या विभागाचे संशोधक काहीना काही आश्चर्यकारक शोधत असतात.

Unknown and mysterious structures with creepy origins | जगातल्या 'या' पाच ठिकाणांवरील धूळ तर काढली, पण यांचा इतिहास आजही आहे रहस्य...

जगातल्या 'या' पाच ठिकाणांवरील धूळ तर काढली, पण यांचा इतिहास आजही आहे रहस्य...

Next

पुरातत्व विभागाकडून सतत काहीतर शोध घेतला जात असतो. धुळीत आणि पाण्यात या विभागाचे संशोधक काहीना काही आश्चर्यकारक शोधत असतात. मातीच्या ढिगाखाली इतिहासाचा शोध घेत असताना कधी कधी अशा काही गोष्टी समोर येतात की, त्यावर विश्वास ठेवणं कठीण होतं. आज आम्ही अशाच काही ठिकाणांबाबत सांगणार आहोत. ही ठिकाणे पुरातत्व विभागाकडून शोधण्यात आली असली तरी या ठिकाणांचे रहस्य मात्र हे विभाग उलगडू शकलं नाही.

१) Teotihuacan, the Real Temple of Doom

(Image Credit : livescience.com)

मेस्किको शहरातील हे मंदिर बघण्यासाठी जगभरातून लोक येतात. पण फार कमी लोकांना माहीत असेल की, या मंदिराचं खरं नाव Teotihuacan आहे. महत्वाची बाब म्हणजे या मंदिराच्या इतिहासबाबत काहीच स्पष्टता नाहीये. म्हणजे हे मंदिर कधी बांधलं गेलं, कुणी बांधलं, हे डिझाइन कुणी तयार केलं याबाबत पुरातत्व विभागाकडे काहीच माहिती नाही. साधारण ५०० वर्षांपूर्वी ही इमारत लोकांसमोर आली. हे मंदिर पुरातत्व विभागासाठी एक रहस्य बनून आहे. असं असलं तरी या ठिकाणाची तुलना न्यूयॉर्क शहराशी केली जाते. 

२) The Works of the Old Men

(Image Credit : ancient-origins.net)

या ठिकाणाला तुम्ही आकाशातून बघू शकता. जमिनीवर तयार झालेल्या या आकृतीवर अनेक प्रश्न उपस्थित होतात. पण आजपर्यंत या आकृतीबाबत काहीही उत्तर मिळालेलं नाही. सौदीच्या वाळवंटातून सीरियाकडे जाताना रेतीच्या कणांमध्ये ही आकृती बघायला मिळते. याबाबत काहीही ठोस माहिती नाही. पण काही कथांनुसार ही आकृती एका वृद्ध व्यक्तीने तयार केली होती. त्यामुळेच या आकृतीला The Works of the Old Men असं म्हटलं जातं. पुरातत्व विभागाचे लोक ही आकृती २ हजार वर्ष जुनी असल्याचं सांगतात. 

३) The Giant Rock Monument Under the Sea of Galilee

भारतातील रामसेतुबाबत तुम्ही ऐकलं असेलच. पण तुम्ही The Giant Rock Monument Under the Sea of Galilee बाबत कधी ऐकलं किंवा वाचलंय का? नसेल तर जाणून घेऊ. Galilee जवळ २००३ मध्ये समुद्रात इस्त्राइलच्या पुरातत्व विभागाचे लोक खोदकाम करत होते. यादरम्यान अचानक समुद्रात एक मोठा डोंगर आढळून आला. हा डोंगर छोट्या छोट्या दगडांना जोडून तयार करण्यात आला होता. पण हा डोंगर कुणी, कधी तयार केला याची काहीच माहिती नाही. आजही याचा शोध घेतला जात आहे. 

४) Nan Madol

Temwen बेटाजवळ Nan Madol हे ठिकाण आहे. Nan Madol डिझाइन फारच आकर्षक आणि सुंदर आहे. पण हे कधी तयार करण्यात आलं होतं याची काहीच माहिती पुरातत्व विभागाकडे नाही. अनेक प्रयत्न करूनही निराशाच हाती आली. त्यामुळे या ठिकाणाबाबत लोकांमध्ये आणि संशोधकांमध्ये बरीच उत्सुकता बघायला मिळते.

५) Goseck Circle: The Murder Observatory

११ वर्षांची मेहनत करूनही जर्मनीतील पुरातत्व विभागाचे लोक या गोलाकार डिझाइनचं रहस्य उलगडू शकले नाहीत. १९९१ मध्ये पहिल्यांदा हे डिझाइन आकाशातून आढळून आलं होतं. पुरातत्व विभागाच्या अंदाजानुसार हे डिझाइन सात हजार वर्ष जुनं आहे. पण यापेक्षा जास्त काहीच माहिती मिळू शकली नाही.


Web Title: Unknown and mysterious structures with creepy origins

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.