जगातल्या पाच प्राचीन रहस्यमय गोष्टी; वैज्ञानिकांना अजूनही यांबाबत पडलंय कोडं!
By ऑनलाइन लोकमत | Published: September 17, 2019 12:24 PM2019-09-17T12:24:16+5:302019-09-17T12:29:09+5:30
विज्ञानामुळे काही गोष्टींचं रहस्य उलगडण्यात यश मिळालंय, पण आजही अशा अनेक गोष्टी आहेत, ज्यांचं रहस्य वैज्ञानिकांनाही उलगडता आलेलं नाही.
जगभरात कितीतरी गोष्टी आजही रहस्य बनून आहेत. विज्ञानामुळे काही गोष्टींचं रहस्य उलगडण्यात यश मिळालंय, पण आजही अशा अनेक गोष्टी आहेत, ज्यांचं रहस्य वैज्ञानिकांनाही उलगडता आलेलं नाही. आज आम्ही तुम्हाला अशाच काही गोष्टींबाबत सांगणार आहोत.
पेरूमध्ये साकसेगेमन हे पौराणिक मंदिर आहे. या मंदिराच्या परिसरात मोठ-मोठ्या दगडांची भिंत आहे. याची सर्वात खास बाब म्हणजे सर्वच दगड एकमेकांशी जुळलेले आहेत. पण आजही हे रहस्य कायम आहे की, हे दगड जोडण्यासाठी कशाचा वापर केला गेला होता आणि हजारो वर्षांआधी हे दगड इतक्या बारकाईने कशे कोरले गेले असतील.
बोलवियामध्ये एक ठिकाण आहे. या ठिकाणाला रहस्यमय शहर म्हटलं जातं. असे म्हणतात की, हजारो वर्षांआधी इथे एक शहर होतं. इथे एक दरवाजा आहे. याला 'गेट ऑफ सन' असं म्हटलं जातं. हा दरवाजा आजही एक कोडं बनून आहे. वैज्ञानिकांना वाटतं की, या दरवाज्याच्या मदतीने त्यावेळी लोक ग्रहांच्या स्थितीचा अंदाज घेत असतील. पण याबाबत ठोस माहिती समोर आली नाही.
जपानमधील व्यक्तीला समुद्रात एका विशाल शहार आढळलं होतं. योनागुनीचं डुबलेलं शहर यालाच म्हणतात. असे मानले जाते की, हे शहर १० हजार वर्षांपूर्वी डुबलं होतं. वैज्ञानिकांचं मत आहे की, पाषाण युगानंतर मनुष्य जेव्हा पहिल्यांदा गुहेबाहेर निघाले तेव्हा त्यांनी याची निर्मिती केली असावी. मात्र, हा केवळ अंदाज आहे.
कोस्टा रिकामध्ये गोल आकाराचे गुळगुळीत अनेक दगड आहेत. हे दगड १९३० मध्ये आढळले होते. यांची खास बाब म्हणजे हे दगड कुणी तयार केले, का केले हे अजूनही उलगडलं गेलेलं नाही. पौराणिक कथांनुसार, या गोल दगडांमध्ये सोनं होतं.
इजिप्तमध्ये खोदकाम करताना एका विशाल स्तंभ सापडला होता. ४२ मीटर लांब हा स्तंभ साधारण १२०० टन वजनी आहे. इतिहासकारांनुसार, या स्तंभाची निर्मिती करताना यावर भेगा पडल्या होत्या, त्यामुळे याचं काम अर्धवट सोडण्यात आलं होतं. पण हे अजूनही रहस्य आहे की, हा विशाल स्तंभ कसा उचलला जात असेल?