खतरनाक डाकूंच्या गावात होतं नवरदेवाचं घर, नवरीने ऐनवेळी लग्नास दिला नकार
By ऑनलाइन लोकमत | Published: January 25, 2022 05:07 PM2022-01-25T17:07:16+5:302022-01-25T17:08:31+5:30
Uttar Pradesh : झालं असं की, बंसरी गावात राहणाऱ्या विपिन कुमारचं लग्न जालौनच्या डॉलीसोबत होणार होतं. लग्नाची पूर्ण व्यवस्था चकरनगरच्या एका खाजगी गेस्ट हाऊसमध्ये करण्यात आली होती.
उत्तर प्रदेशच्या (Uttar Pradesh) इटावा (Etawah) जिल्ह्यात चंबलमध्ये एका नवरीने नवरदेवाच्या गळ्यात हार घातल्यानंतर लग्नास नकार दिला. नवरीने लग्न करण्यास जे कारणं सांगितलं ते सर्वांनाच हैराण करणारं होतं. नवरीने ऐनवेळी लग्न करण्यास नकार दिला कारण नवरदेवाचं गाव खतरनाक डाकूंचं गाव आहे.
इटावाचे एसएसपी जयप्रकाश सिंहने याप्रकरणी सांगितलं की, चमरनगर गावात वरमाला रिवाज झाल्यानंतर नवरीने लग्न करण्यास नकार दिला. यानंतर नवरी आणि नवरदेव पक्षाकडील काही लोकांमध्ये वाद झाला. ज्याची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले. दोन्ही परिवारांकडून कोणतीही तक्रार दिली गेली नाही. दोन्ही पक्षांनी आपसात ठरवून लग्न रद्द केलं.
काही प्रत्यदर्शींनुसार, नवरीसमोर कुणाचं काही चाललं नाही आणि अखेर नवरदेवाला वरात परत न्यावी लागली. असं सांगितलं जात आहे की, बाब फक्त इतकी होती की, नवरदेवाचं घर गावात होतं आणि नवरीला वरमाला रिवाजानंतर कुणीतरी सांगितलं की, तिला गावातच रहावं लागणार आहे.
झालं असं की, बंसरी गावात राहणाऱ्या विपिन कुमारचं लग्न जालौनच्या डॉलीसोबत होणार होतं. लग्नाची पूर्ण व्यवस्था चकरनगरच्या एका खाजगी गेस्ट हाऊसमध्ये करण्यात आली होती. विपिन कुमारची वरात २२ जानेवारीला सांयकाळी धुम-धडाक्यात पोहोचली होती. वरातींच्या स्वागतानंतर वरमाला कार्यक्रम झाला. त्यानंतर वरातील आणि नवरीच्या घरातील पाहुणे जेवायला बसले.
लग्नाचे बाकीचे रितीरिवाज अर्ध्या रात्री सुरू होणार होते. नवरी-नवरदेवाला लग्न मंडपात बसवण्यात आलं आणि नवरीच्या भांगेत कुंकू भरण्याचा रिवाज सुरू झाला. सप्तपदी होणारच होती की, यादरम्यान नवरीला समजलं की, तिला पाठवणीनंतर बंसरी गावातच रहावं लागणार आहे. हे नवरीला समजताच तिने सप्तपदी घेण्यास नकार दिला. लोकांनी नवरीला खूप समजावण्याचा प्रयत्न केला, पण सगळ्यांचे प्रयत्न अपयशी ठरले.
नवरीने ऐनवेळी लग्नास नकार दिला म्हणून थोडा वेळी तिथे वाद सुरू झाला होता. असं वाटत होतं की, दोन्ही पक्षाकडील लोक आपसात भिडतील. त्यामुळे सूचना मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले. नंतर पोलिसांनीही नवरीला समजावण्याचा प्रयत्न केला. पण तरीही तिने कुणाचं काही ऐकलं नाही. अखेर वरातीला परत जावं लागलं. नवरीने नवरदेवासोबत जाण्यास नकार दिला.