टॉयलेटला जाऊन येतो सांगत मंडपातून नवरदेव फरार, रडत बसली होती नवरी!
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 28, 2023 13:16 IST2023-06-28T13:15:45+5:302023-06-28T13:16:30+5:30
Groom run away from marriage : ठरलेल्या तारखेला नवरी-नवरदेव दोघेही आपल्या परिवारांसोबत सामूहिक विवाह मेळाव्यात पोहोचले होते. सगळीकाही व्यवस्थित सुरू होतं आणि लग्नाचे रितीरिवाज पार पाडले जात होते.

टॉयलेटला जाऊन येतो सांगत मंडपातून नवरदेव फरार, रडत बसली होती नवरी!
Groom run away from marriage : सध्या सगळीकडे लग्नाचा सीझन सुरू आहे. त्यामुळे वेगवेगळ्या ठिकाणांहून लग्नासंबंधी अजब अजब घटना समोर येत असतात. अशीच एक घटना उत्तर प्रदेश कन्नौजमधून समोर आली आहे. इथे एक नवरदेव कथितपणे टॉयलेटला जाण्याचा बहाना करून लग्नातून पळून गेला.
मीडिया रिपोर्टनुसार, फतेहपूर जसोदा गावातील तरूणाचं लग्न गुरसहायगंज येथील तरूणीसोब ठरलं होतं. त्यांचं लग्न कनौजमध्ये मुख्यमंत्री सामूहिक विवाह मेळाव्यात करण्याचं ठरलं होतं. जे 23 जूनला होणार होतं. लग्नाची सगळी तयारी झाली होती आणि काही पाहुण्यांनाही बोलवण्यात आलं होतं.
ठरलेल्या तारखेला नवरी-नवरदेव दोघेही आपल्या परिवारांसोबत सामूहिक विवाह मेळाव्यात पोहोचले होते. सगळीकाही व्यवस्थित सुरू होतं आणि लग्नाचे रितीरिवाज पार पाडले जात होते. तेव्हाच नवरदेव म्हणाला की, त्याला टॉयलेटला जायचं आहे. ज्या ठिकाणी लग्न होत होतं तिथून बाहेर आल्यावर नवरदेवाला लग्नाबाबत संशय आला. तेव्हाच तो तिथून फरार झाला. बराच वेळ होऊनही नवरदेव परत आला नाही म्हणून लग्न मंडपात एकच गोंधळ उडाला. ज्यानंतर दोन्ही परिवारांनी त्याला शोधणं सुरू केलं.
दरम्यान, नवरदेवाचा परिवारही लग्न मंडपातून फरार झाला. नवरीकडील लोकांनी त्यांचाही शोध घेतला, पण ते काही सापडले नाहीत. अशात मेकअप करून बसलेली नवरी रडायला लागली होती. शेवटी लग्न न करता ती घरी परतली. नवरदेव का पळाला हे समजल्यावर लोकही हैराण झाले. कारण नवरदेवाच्या परिवारालाही याबाबत काही माहीत नव्हतं.