बुलेट फायरिंग अन् हेल्पलाईनला थेट कॉल, महिलांवरील अत्याचार रोखणारी पर्स नक्की काय आहे?
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 12, 2022 20:40 IST2022-09-12T20:24:08+5:302022-09-12T20:40:19+5:30
महिला सुरक्षेचा प्रश्न एरणीवर आला आहे. अनेकजण याबाबत कठोर कारवाई अन् कायद्यांची मागणी करत आहे पण हे होऊ नये यासाठी काय करता येईल याचा विचार फार कमीजण करत आहेत. युपीमधील श्याम चौरसिया या व्यक्तीने मात्र यावर एक उपाय शोधुन काढला आहे.

बुलेट फायरिंग अन् हेल्पलाईनला थेट कॉल, महिलांवरील अत्याचार रोखणारी पर्स नक्की काय आहे?
सध्या महिलांवरील अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. अशावेळी महिला सुरक्षेचा प्रश्न एरणीवर आला आहे. अनेकजण याबाबत कठोर कारवाई अन् कायद्यांची मागणी करत आहे पण हे होऊ नये यासाठी काय करता येईल याचा विचार फार कमीजण करत आहेत. युपीमधील श्याम चौरसिया या व्यक्तीने मात्र यावर एक उपाय शोधुन काढला आहे. तोही टेक्नॉलॉजीच्या मदतीने.
त्याने एक अशी पर्स शोधली आहे ज्यामुळे महिलांचे रक्षण होऊ शकते. यामध्ये एक सँडल आणि इअरिंग असेल, जे दिसायला सामान्य आहे. पण सँडलमध्ये ब्लुटूथची सुविधा आहे तसेच इअरिंगमध्ये जीपीएस आहे त्यामुळे महिला जर संकटात सापडली तर त्या ब्लुटुथवर इमर्जन्सी पोलिस स्टेशनच्या हेल्पलाईन नंबरवर कॉलची सुविधा आहे. तसेच जीपीएसमुळे महिलेचे लोकेशन समजु शकेल. पर्समधील लाल बटण दाबताच गोळ्या फायर होतात व त्याचा आवाज येतो त्यामुळे लोकांचे लक्ष वेधले जाते व लोक लगेचच मदतीसाठी धाऊ शकतात. यातील गोळ्या खाली असतात.
अशापद्धतीने टेक्नॉलॉजीचा उत्तम उपयोग करुन या माणासाने महिलांसाठी उत्तम सुरक्षा किट म्हणजेच सुरक्षा पर्स तयार केली आहे.