UPSC Interview Questions: चला होऊन जाऊद्या; हुशारीने उत्तर द्या; बाजारात खरेदी करता येत नाही, अशा फळाचे नाव सांगा?
By ऑनलाइन लोकमत | Published: February 7, 2022 09:10 PM2022-02-07T21:10:55+5:302022-02-07T21:11:59+5:30
UPSC, IAS Interview Questions, Answers: अनेकजण परीक्षा पास होतात, परंतू मुलाखतीवेळी लटकतात. मुलाखतींमध्ये अनेक असे प्रश्न असतात ज्याचे उत्तर उमेदवारांकडे नसते. चला जाणून घेऊया असे काही प्रश्न आणि त्यांची उत्तरे.
देशात जे आयएएस, आयपीएस अधिकारी असतात ते अशाच अनेक चित्र विचित्र प्रश्नांची उत्तरे देऊन बनलेले असतात. अनेकांना आयएएस व्हायचे असते, परंतू फार कमी जण या परीक्षा, मुलाखती पास होतात. अनेकजण परीक्षा पास होतात, परंतू मुलाखतीवेळी लटकतात. त्यांना या द्विधा, कोड्यात टाकणाऱ्या प्रश्नांची उत्तरे देता येत नाहीत. या राऊंडमध्ये फेल झाल्याने संधी जाते.
या मुलाखतींमध्ये अनेक असे प्रश्न असतात ज्याचे उत्तर उमेदवारांकडे नसते. चला जाणून घेऊया असे काही प्रश्न आणि त्यांची उत्तरे.
प्रश्न- एक असा प्राणी जो जखमी होतो तेव्हा त्याचे रडणे मानवासारखेच असते?
उत्तर - अस्वल
प्रश्न- कोणत्या देशाला दक्षिणेचे ब्रिटन म्हटले जाते?
उत्तर: न्यूझीलंड
प्रश्न- आठ दिवस न झोपता माणूस कसा जगू शकतो?
उत्तर- दिवसाऐवजी रात्री झोपणे
प्रश्न- अशी कोणती गोष्ट आहे जी महिन्यातून एकदाच येते? ही गोष्ट 24 तास पूर्ण झाल्यावर परत संपते आणि नंतर त्या महिन्यात येत नाही.
उत्तर - तारीख
प्रश्न- कोंबडी अंडी घालते आणि गाय दूध देते. दोन्ही कोण देते? प्रश्नाचे उत्तर द्या.
उत्तर- दुकानदार. तो दुकानातून तुम्हाला दूध आणि अंडी दोन्ही देतो.
प्रश्न- अर्धे सफरचंद कसे दिसते?
उत्तरः सफरचंदाच्या दुसऱ्या अर्ध्या भागाप्रमाणे
प्रश्न- बाजारात खरेदी करता येत नाही, अशा फळाचे नाव सांगा?
उत्तरः कष्टाचे फळ
प्रश्न- एका खुन्याला मृत्यू दंडाची शिक्षा झाली. त्याला तीन खोल्या दाखवल्या गेल्या. पहिल्या खोलीत आग लागली होती. दुसऱ्या खोलीत बंदुका ठेवल्या होत्या. त्याचवेळी तिसऱ्या खोलीत एक वाघ आहे ज्याने तीन वर्षांपासून काहीही खाल्ले नाही. त्याला तिघांपैकी कोणाकडे जायला आवडेल?
उत्तर- तिसऱ्या खोलीत. कारण तीन वर्षे वाघाने काही खाल्ले नाही तर भुकेने मेला असेल.