भारत-चीनच्या सीमेवर कोंबडीनं दिलं अंडं; मग ते अंडं कोणाचं? UPSCमध्ये विचारला प्रश्न

By ऑनलाइन लोकमत | Published: February 18, 2022 12:11 PM2022-02-18T12:11:42+5:302022-02-18T12:14:02+5:30

यूपीएससीच्या मुलाखतीत विचारण्यात आला प्रश्न; तुम्हाला माहित्येय का उत्तर

upsc interview questions ias level questions and answers latest and original hen eggs india china | भारत-चीनच्या सीमेवर कोंबडीनं दिलं अंडं; मग ते अंडं कोणाचं? UPSCमध्ये विचारला प्रश्न

भारत-चीनच्या सीमेवर कोंबडीनं दिलं अंडं; मग ते अंडं कोणाचं? UPSCमध्ये विचारला प्रश्न

googlenewsNext

नवी दिल्ली: प्रशासकीय सेवेत जाण्याचं, अधिकारी होण्याचं स्वप्न लाखो तरुण पाहतात. पण अतिशय कमी जणांचं ते स्वप्न पूर्ण होतं. आयएएस परीक्षा देशातील सर्वात अवघड परीक्षा मानली जाते. काही जण लेखी परीक्षेत उत्तीर्ण होतात. पण मुलाखतीमध्ये अपयशी ठरतात. 

प्रशासकीय परीक्षेत उत्तीर्ण व्हायचं असल्यास हुशारी आणि मेहनतीशिवाय पर्याय नाही. कारण कोणताही शॉर्टकट इथे कामी येत नाही. यूपीएससीच्या सुरुवातीच्या परिक्षेनंतर उमेदवार मेन्सची तयारी सुरू करतात. त्यात यशस्वी ठरल्यानंतर त्यांची मुलाखत घेतली जाते. ही मुलाखत हुशारीची परीक्षा पाहणारी ठरते.

प्रश्न- पुरुषांची वाढते, पण महिलांची वाढत नाही, अशी गोष्ट कोणती?
उत्तर- दाढी, मिशी

प्रश्न- विमान प्रवासादरम्यान बाळ जन्माला आल्यास त्याचं नागरिकत्व काय?
उत्तर- भारतीय नियमांनुसार, मुलाचे आई-वडील भारतीय असल्यास ते मूलही भारतीयच असेल. त्याचा जन्म भारताबाहेर झाला असला तरी ते भारतीयच असेल.

प्रश्न- माणसाच्या शरीरात असा कोणता अवयव आहे जो दर २ महिन्यांनंतर बदलतो?
उत्तर- मेंदू

प्रश्न- कोंबडीनं भारत-चीन सीमेवर अंडं दिल्यास ते अंडं कोणाचं?
उत्तर- कोंबडीचं

प्रश्न- गुलाब, झेंडू आणि फ्लॉवरमध्ये काय समानता आहे?
उत्तर- सगळी फुलं आहेत

Web Title: upsc interview questions ias level questions and answers latest and original hen eggs india china

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.