४८ वर्षीय आईने तरूणांसोबत फ्लर्ट करण्यासाठी चोरलं मुलीचं ओळखपत्र, स्टुडंट बनून केलं डेटींग
By ऑनलाइन लोकमत | Published: December 11, 2021 01:48 PM2021-12-11T13:48:54+5:302021-12-11T13:50:58+5:30
४८ वर्षी लॉरा ऑगलेस्बीला आपल्या मुलीचं ओळखपत्र चोरी केल्याप्रकरणी आणि सामाजिक सुरक्षा फसवणूक प्रकरणी पाच वर्ष तुरूंगवास भोगावा लागत आहे.
तुम्ही अनेकदा पाहिलं असेल की, पालक आपल्या मुलांच्या शिक्षणासाठी वाट्टेल ते करतात. ते स्वत:च्या पोटाला चिमटा काढतात, पण लेकरांच्या शिक्षणाकडे अधिक लक्ष देतात. पण आज आम्ही एका अशा घटनेबाबत सांगणार आहोत जी वाचून तुम्ही हैराण व्हाल. एका ४८ वर्षीय महिलेने आपल्या २२ वर्षीय मुलीचं ओळखपत्र चोरी केलं आणि त्यापासून मिळणाऱ्या फायद्यांचा लाभही घेतला. ही घटना अमेरिकेच्या मिसई प्रांतातील आहे.
आईने मुलीला फसवलं
४८ वर्षी लॉरा ऑगलेस्बीला आपल्या मुलीचं ओळखपत्र चोरी केल्याप्रकरणी आणि सामाजिक सुरक्षा फसवणूक प्रकरणी पाच वर्ष तुरूंगवास भोगावा लागत आहे. ४८ वर्षीय लॉराने बरेच महिेने ती २२ वर्षांची असल्याचं नाटक केलं आणि दोन वर्ष वेगळी राहत असलेली मुलगी लॉरेन एशले हेजचा वापर केला. तिने हेजच्या नावावर एक सामाजिक सुरक्षा कार्डसाठी अर्ज केला. स्टुंडट लोन काढलं, कॉलेजमध्ये प्रवेश घेतला आणि इतकंच नाही तर विश्वविद्यालयातील विद्यार्थ्यांना तिने डेटही केलं.
बनवले बॉयफ्रेन्ड
माउंटेन व्यू पोलीस विभागाचे चीफ जेमी पार्किन्सने न्यूयॉर्क टाइम्सला सांगितलं की, 'प्रत्येक व्यक्ती तिच्यावर विश्वास ठेवत होता'. तिने लोकांना याचा विश्वास दिला की, ती तिच आहे जी ओळखपत्रात दिसत आहे. तिने काही बॉयफ्रेन्डही होते ज्यांना वाटत होतं की, तिचं वय २२ आहे. लॉराला सामाजिक सुरक्षा प्रशासनाला मुद्दामहून चुकीची माहिती देण्याबाबत दोषी ठरवण्यात आलं आहे. तिने २०१६ पासूनच मुलीच्या नावाने फसवणूक सुरू केली होती.
मुलीसारखंच जगत होती
लॉराने पूर्णपणे तरूणीसारखी लाईफस्टाईल अंगीकारली होती. कपडे, मेकअप आणि पर्सनॅलिटीही तशीच होती. तिने पूर्णपणे आधीपासून कमी वयाची तरूणी होण्याचं स्वप्न पाहिलं होतं. लॉराचं एक सोशल मीडिया अकाऊंटही होतं. ज्यात तिने तिला तिच्या मुलीच्या रूपात दाखवलं होतं. फोटो फिल्टरमधून एडीट करून तरूण असल्याचं नाटक केलं होतं.