बोंबला! महिलेने ११ वेळा केलं लग्न, तरी आता पुन्हा शोधत आहे नवीन नवरदेव
By ऑनलाइन लोकमत | Published: December 2, 2021 11:34 AM2021-12-02T11:34:00+5:302021-12-02T11:34:28+5:30
मिरर यूकेच्या रिपोर्टनुसार मोनेट म्हणाली की, जेव्हा ती लहान होती तेव्हा ती तिच्या भावाच्या मित्रांसोबत लग्न करण्याची कल्पना करत होती.
सामान्यपणे लोक एक किंवा दोन वेळा लग्न करतात. पण काही लोकांना लग्न म्हणजे नुसता खेळ किंवा मजा वाटते. अशाच एका महिलेचा कारनामा सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. ५२ वर्षीय अमेरिकन (America) महिलेने ११ वेळा वेगवेगळ्या पुरूषांसोबत लग्न केली. आता ती पुन्हा एका नव्या पार्टनरच्या शोधात आहे. या महिलेचं नाव मोनेट असून तिला लग्न करण्याची 'सवय' लागली आहे.
मिरर यूकेच्या रिपोर्टनुसार मोनेट म्हणाली की, जेव्हा ती लहान होती तेव्हा ती तिच्या भावाच्या मित्रांसोबत लग्न करण्याची कल्पना करत होती. हाय स्कूलचं शिक्षण पूर्ण झाल्यावर मोनेटने लगेच पहिलं लग्न केलं. त्यानंतर तिने ९ वर्षे वेगवेगळ्या ११ पुरूषांसोबत लग्ने केली. पण यातील कोणतही लग्न जास्त काळ टिकू शकलं नाही.
मोनेट आता ५२ वर्षांची झाली आहे. पण आजही ती एक परफेक्ट पार्टनरच्या शोधात आहे. TLC न्यूज चॅनलसोबत बोलताना मोनेट म्हणाली की, ती यापेक्षा जास्त लोकांसोबत लग्न करू शकते. तिला लग्नाचे २८ इतर प्रपोजल मिळाले होते.
५२ वर्षीय महिला म्हणाली की पुन्हा पुन्हा लग्न मोडत असल्याने ती निराश नाही. मोनेट आता ५७ वर्षीय जॉन नावाच्या व्यक्तीला दोन वर्षापासून डेट करत आहे.
जॉन म्हणाला की, 'आमची भेट ऑनलाईन झाली होती. काही दिवसांनी मी मोनेटला सांगितलं की, मी तिच्यावर प्रेम करतो. मी स्वत: भावनां व्यक्त करण्यावर विश्वास ठेवतो. मला जे योग्य वाटलं ते केलं'. मोनेट आणि जॉन लवकरच लग्न करणार आहेत. असशाप्रकारे मोनेटचं हे १२वं लग्न असेल.
मोनेट म्हणाली की, पाचव्या नंबरचा पती कदाचित माझ्यासाठी सर्वात चांगला होता. सहाव्या नंबरचा पती देखील चांगल्या स्वभावाचा होता. त्यामुळे मी त्याच्यासोबत दोनदा लग्न केलं होतं. आठव्या नंबरच्या पतीसोबत ऑनलाईन भेट झाली होती आणि मग एका आठवड्यानंतर त्याच्यासोबत लग्न केलं होतं. तेच नवव्या नंबरचा पती जादुई व्यक्तीत्वाचा धनी होता. महिला म्हणाली की, दहाव्या नंबरच्या पतीला मी शाळेपासून ओळखत होते. तो फार चांगला व्यक्ती आहे, पण नंतर मला वाटलं की, आम्ही केवळ चांगले मित्र बनून रहायला पाहिजे. त्यामुळे आम्ही वेगळे झालो.