जोडीदारासोबत हवेत एन्जॉय करा खासगी क्षण; ४५ मिनिटांचा प्लॅन, किती खर्च येईल?

By ऑनलाइन लोकमत | Published: February 8, 2022 01:59 PM2022-02-08T13:59:44+5:302022-02-08T14:01:10+5:30

कपल्सच्या प्रायव्हसीची एअरलाइन कंपनीनं पूर्ण काळजी घेतली आहे.

Us Airline Love Cloud Offering Couple To romantic scenic tours for this summer | जोडीदारासोबत हवेत एन्जॉय करा खासगी क्षण; ४५ मिनिटांचा प्लॅन, किती खर्च येईल?

जोडीदारासोबत हवेत एन्जॉय करा खासगी क्षण; ४५ मिनिटांचा प्लॅन, किती खर्च येईल?

Next

वॉश्गिंटन  - फेब्रुवारी महिना म्हटलं तर प्रेमी जोडप्यांसाठी आनंदाचे दिवस. जगातील अनेक कपल्स हटके पद्धतीने प्रेमाचे दिवस साजरे करण्याची स्वप्न पाहतात. या कपल्ससाठी प्रसिद्ध अमेरिकेच्या लॉस वेगास शहरात एका एअरलाइन्स कंपनीनं हवेत प्रेम करणं आणि खासगी क्षण घालवण्यासाठी सुविधा उपलब्ध करुन देत आहे. इतकेच नाही तर हवेतही कपल्सच्या प्रायव्हसीची काळजी घेण्यात आली आहे. जवळपास ४५ मिनिटांच्या या अनोख्या प्लॅनसाठी ९९५ डॉलर अथवा ७४ हजार २७४ रुपये भरावे लागणार होते.

हे विमान लॉस वेगासहून उड्डाण करुन काही अंतरापर्यंत जाते. विमानात ज्या भागात कपल्स राहतात त्याठिकाणी पडद्याने झाकण्यात आले आहे. याठिकाणी पायलट हेडफोन घालतो. जेणेकरुन विमानातील आतील आवाज ऐकायला येऊ नये. विमानाचा पायलट कॉकपिटमध्येच राहील. त्याला कपल्सच्या आसपास फिरकण्याची परवानगी नाही असे नियम पायलटसाठी बनवण्यात आले आहे.

माइल हाई क्लब फ्लाइटमध्ये मेंबरशिपची सुविधा

अमेरिकेच्या लव क्लाइड या एअरलाईन कंपनीनं हा अनोखा प्लॅन आणला आहे. कंपनीनं म्हटलं आहे की, हवेत खासगी क्षण घालवण्याची सुविधा देत लग्न वाचवण्याचा प्रयत्न करत आहोत. सध्या बदलत्या काळानुसार, घटस्फोटाचे प्रमाण वाढले आहे. जर तुम्ही ११९५ डॉलर दिले तर हवेतच तुमचं लग्न करण्याचा पर्यायही एअरलाइन कंपनीनं दिला आहे. जर १०० डॉलर दिले तर एक रॉमेन्टिक जेवणही दिलं जाईल. या तिन्ही सुविधा केवळ १५९५ डॉलरमध्ये ग्राहकांना मिळू शकतात.

लव क्लाइडचे संस्थापक आणि पायलट एँडी जॉन्सन म्हणाले की, माइल हाय क्लब फ्लाइट मेंबरशिपची सुविधा जी लोकप्रिय आहे. कपल्स त्यांच्या चेहऱ्यावरील हास्यासोबत विमानात प्रवेश करतात आणि अधिक हास्याने पुन्हा परतात. एअरलाइननं या सुविधेसाठी ४१४ विमानं घेतली आहे. लव क्लाइड अधिकाधिक कपल्ससाठी बुकींग करतं. त्यात ३ अथवा ४ लोकांचा ग्रुपही सहभागी असतो. प्रत्येक व्यक्तीला २०० डॉलर अतिरिक्त द्यावे लागतात असं त्यांनी सांगितले.

स्वच्छतेची काळजी, दारु मिळत नाही

विमानाच्या आतमध्ये कपल्सला स्वर्गाचा आनंद मिळावा अशी सुविधा देण्यात आली आहे. लाल रंगाच्या उशा पलंगावर ठेवल्या आहेत. एका पडद्याच्या सहाय्याने पायलट आणि कपल्स यांना वेगळे केले आहे. प्रत्येक प्रवासानंतर विमानातील बेड पूर्णपणे स्वच्छ करण्यात येतो. जर कुणी रॉमेन्टिक जेवण ऑर्डर करत असेल तर एक टेबल, चेअर उपलब्ध करुन दिले जातात. सॅम्पेनशिवाय विमानात कुठल्याही प्रकारे दारु वितरित केली जात नाही.

Web Title: Us Airline Love Cloud Offering Couple To romantic scenic tours for this summer

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.