डॉक्टरने कबरेतून तरूणीचा मृतदेह काढला, मग सात वर्ष नवरी बनवून आपल्यासोबत ठेवला...
By ऑनलाइन लोकमत | Published: March 16, 2023 03:24 PM2023-03-16T15:24:24+5:302023-03-16T15:25:41+5:30
Doctor Lived With Dead Body : अमेरिकेच्या फ्लोरिडामध्ये राहणारे डॉ. डेथ नावाने प्रसिद्ध कार्ल तंजलर यांनी एकदा एका तरूणीचा मृतदेह कबरेतून चोरी केला आणि तिला नवरी बनवून अनेक वर्ष आपल्याजवळ ठेवला.
Doctor Lived With Dead Body : प्रेम एक फार चांगली जाणीव आहे. पण अनेक प्रेमकथा नेहमी चांगल्या असतात असं नाही. अशाच एका डॉक्टरची एक अजब प्रेमकथा आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. अमेरिकेच्या फ्लोरिडामध्ये राहणारे डॉ. डेथ नावाने प्रसिद्ध कार्ल तंजलर यांनी एकदा एका तरूणीचा मृतदेह कबरेतून चोरी केला आणि तिला नवरी बनवून अनेक वर्ष आपल्याजवळ ठेवला.
डॉ. कार्ल तंजलर यांनी मृतदेह संरक्षित केला आणि तिचे डोळे काचाचे केले आणि चेहऱ्यावर मास्क लावला. जोपर्यंत मृत महिलेच्या कुटुबियांना हे समजलं नाही तोपर्यंत महिलेचा मृतदेह सात वर्ष डॉक्टरने नवरी बनवून आपल्याजवळ ठेवला. कारण तो तिच्यावर एकतर्फी प्रेम करत होता. त्यानंतर पोलिसांना सूचना देण्यात आली.
मारिया एलेबा मिलाग्रो डी होयोस या मृत महिलेला आपली प्रेयसी मानणारा डॉक्टर जेव्हाही तिचे डोळे बघत होता तेव्हा तो हैराण होत होता. ती त्याची पेंशट होती. त्याला असं वाटलं की, तो या महिलेवर खरं प्रेम करतो. जिवंत असताना ती त्याला भेटू शकली नाही म्हणून त्याने तिचा मृतदेह एका खास ठिकाणी ठेवला आणि तिला नवरी बनवून ठेवलं.
जेव्हा हे पोलिसांसमोर आलं तेव्हा त्यांना ताब्यात घेण्यात आलं. पण कायदेशीर त्रुटींमुळे त्यांच्यावर कधीही केस केली गेली नाही. ऐलेनाचा परिवार मुलीचा मृतदेह पाहून घाबरले होते आणि तिच्या बहिणीने कोर्टात सांगितलं होतं की, ही तिच्या जीवनातील आतापर्यंतची सगळ्यात अजब घटना आहे.
डॉक्टरला विश्वास होता की, तो एक दिवस ऐलेनाला आपल्या जीवनात परत आणेल, त्यासाठी त्याचे प्रयत्न सुरू होते. त्याने मृतदेहावर अनेक प्रयोग केले. डॉक्टर तंजलरची भेट 21 वर्षीय ऐलेनासोबत तेव्हा झाली होती जेव्हा ती वेस्ट फ्लोरिडाच्या एका हॉस्पिटलमध्ये त्याची पेशंट होती.
जर्मनीमध्ये जन्माला आलेले डॉक्टर तंजलर तिच्यावर उपचार करत होते. डॉ कार्ल तंजलर यांचा जन्म 1877 मध्ये ड्रेसडेनमध्ये झाला होता. पण पहिल्या महायुद्धानंतर ते यूएसला आले. तिथे त्यांनी काउंट कार्ल वॉन कोसेल नावाने लोकप्रियता मिळवली. त्यांचा दावा होता की, त्यांच्याकडे विश्वविद्यालयाच्या 9 डिग्री आहेत. त्यांनी दावा केला होता की, त्यांना काही स्वप्न दिसत होते ज्यात दिसणारी तरूणी ही ऐलेनासारखीच होती. त्यामुळे ते तिच्या मागे लागले होते.