डुकराची किडनी ट्रान्सप्लांट केलेल्या पहिल्या व्यक्तीचं निधन, डॉक्टर म्हणाले....

By ऑनलाइन लोकमत | Published: May 14, 2024 12:52 PM2024-05-14T12:52:46+5:302024-05-14T12:58:49+5:30

यावर्षी मार्चमध्येच या सर्जरीच चर्चा जगभरात रंगली होती. पण डुकराची किडनी या व्यक्तीला केवळ 2 महिनेच जिवंत ठेवू शकली.

US : First person rick Slayman to get pig kidney transplant died | डुकराची किडनी ट्रान्सप्लांट केलेल्या पहिल्या व्यक्तीचं निधन, डॉक्टर म्हणाले....

डुकराची किडनी ट्रान्सप्लांट केलेल्या पहिल्या व्यक्तीचं निधन, डॉक्टर म्हणाले....

दोन महिने रिक स्लेमॅनच्या शरीरात डुकराची किडनी लावण्यात आली होती. जगात पहिल्यांदाच एखाद्या मनुष्याच्या शरीरात दुसऱ्या प्राण्याचा अवयव लावण्यात आला होता. यावर्षी मार्चमध्येच या सर्जरीच चर्चा जगभरात रंगली होती. पण डुकराची किडनी या व्यक्तीला केवळ 2 महिनेच जिवंत ठेवू शकली.

62 वर्षीय रिक अमेरिकेच्या मॅसाच्युसेट्सच्या वेमाउथ भागात राहत होते. त्यांच्या शरीरात डुकराची किडनी जेनेटिकली मॉडिफाय करून लावण्यात आली होती. या सर्जरीला साधारण 4 तास लागले होते. ऑपरेशन 16 मार्च 2024 ला मॅसाच्युसेट्स जनरल हॉस्पिटलमध्ये करण्यात आलं होतं. स्लेमॅनला असलेला किडनीचा आजार लास्ट स्टेजवर होता.

याआधी त्यांनी आपल्या शरीरात मनुष्याची किडनी ट्रांसप्लांट केली होती. पण काही वर्षानी ती किडनीही फेल झाली होती. त्यानंतर डॉक्टरांनी डुकराची किडनी ट्रांसप्लांट करण्याचं ठरवलं. स्लेमॅनचं डायलिसिस सुरू झालं. पण त्याच्या समस्या वाढत जात होत्या. डॉक्टरांना आशा होती की, डुकराची किडनी जास्त काळ साथ देईल.

पण याआधी अशी सर्जरी कधीही करण्यात आली नव्हती. डॉक्टरांनी डुकराची किडनी जेनेटिकली मॉडिफाय केली. जेणेकरून रिक स्लेमॅनच्या शरीरासोबत मॅच व्हावी. रिकची सर्जरी झाली आणि काही आठवड्यांनंतर त्याचं निधन झालं. फण त्याची सर्जरी करणाऱ्या डॉक्टरांचं म्हणणं आहे की, किडनी ट्रांसप्लांटचा रिकच्या मृत्यूशी काहीही संबंध नाही. 

हॉस्पिटलकडून सांगण्यात आलं की, आम्ही रिक स्लेमॅनच्या निधनाने दु:खी आहोत. पण त्यांच्या मृत्यूचा किडनी ट्रांसप्लांटसोबत काहीही संबंध नाही. हॉस्पिटलकडून रिक स्लेमॅनच्या मृत्यूचं कारण सांगण्यात आलं नव्हतं. मार्च 2024 पर्यंत साधारण एक लाख अमेरिकन लोकांना अवयवांची गरज आहे. यातील 89 हजार लोकांना केवळ किडनीची गरज आहे. या यातीत असलेल्या लोकांपैकी दररोज 17 लोकांचा मृत्यू होतो.

प्राण्यांचे अवयव मनुष्यांच्या शरीरात लावण्याला जेनोट्रांसप्लांटेशन म्हटलं जातं. याने अवयवांची वाढती मागणी पूर्ण केली जाऊ शकते. रिक स्लेमॅन याच्याआधी ब्रेन डेड रूग्णाच्या शरीरात प्राण्याचे अवयव लावण्यात आले होते. 2022 मध्ये मेरीलॅंडच्या एका व्यक्तीला सगळ्यातआधी डुकराची किडनी लावण्यात आली होती. पण तो सर्जरीच्या काही तासांनंतरच मरण पावला होता.

Web Title: US : First person rick Slayman to get pig kidney transplant died

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.