कोकेन समजून सुनावली १५ वर्षांची शिक्षा, नंतर समजलं ते दूध पावडर होतं!
By ऑनलाइन लोकमत | Published: October 19, 2019 01:13 PM2019-10-19T13:13:07+5:302019-10-19T13:21:39+5:30
एका रस्त्यावर राहणाऱ्या व्यक्तीला काही दिवसांपूर्वी कोर्टाने कोकेन ठेवण्याच्या आरोपाखाली १५ वर्षाची तुरूंगवासाची शिक्षा सुनावली होती.
अमेरिकेतील एका व्यक्तीला १५ वर्षांचा तुरूंगवास होता होता राहिला. झालं असं की, इथे एका रस्त्यावर राहणाऱ्या व्यक्तीला काही दिवसांपूर्वी कोर्टाने कोकेन ठेवण्याच्या आरोपाखाली १५ वर्षाची तुरूंगवासाची शिक्षा सुनावली होती. नंतर त्याच्याकडील कोकेन टेस्टिंगसाठी लॅबमध्ये पाठवलं तर ते कोकेन नसून दूध पावडर असल्याचं समोर आलं.
क्रॉडी ग्रेग यूएस ही व्यक्ती ओकलाहोमा येथे राहते. ऑगस्टमध्ये त्याला अटक करण्यात आली होती. कोर्टाने कोकेन जवळ ठेवण्याच्या आरोपात त्याला १५ वर्षांची शिक्षा सुनावली होती. रेकॉर्डनुसार, ग्रेगवर ड्रग्सच्या तस्करीचा आरोप होता. त्यानंतर त्याला ओकलाहोमा काउंटी तुरूंगात पाठवण्यात आलं होतं.
ग्रेगच्या अटकेनंतर लॅब रिपोर्टसमोर आला. ज्याला कोर्टाने कोकेन समजलं ते मुळात दूध पावडर होतं. हे समोर आल्यावर कोर्टाच्या न्यायाधिशांनी ग्रेगची सुटका करण्याचे आदेश दिले.
ग्रेगला १२ ऑगस्टला अटक करण्यात आली होती. तो बाईकवरून पळत होता म्हणून ट्रॅफिक पोलीस त्याचा पाठलाग करत होते. त्याच्या बाईकला लाइटही नव्हते. ट्रॅफिक पोलीस त्याला पकडण्यासाठी पाठलाग करू लागले. त्याला पकडण्यात आलं आणि बॅगती झडती घेतली गेली. त्याच्याकडे असलेल्या कॉफी कॅनमध्ये पांढरं पावडर आढळलं. प्राथमिक तपासणीत असं आढळलं की, त्याच्याकडे ३५ ग्रॅम कोकेन होतं. पण मुळात ते कोकेन नसून दूध पावडर होतं.