VIDEO : चर्चमधील लोकांवर अचानक ताणली 'त्याने' पिस्तुल, पादरींनी रिअल हिरो बनून वाचवला सर्वांचा जीव

By ऑनलाइन लोकमत | Published: November 11, 2021 01:46 PM2021-11-11T13:46:20+5:302021-11-11T13:50:05+5:30

America : अमेरिकेतील नाशविले लाइट मिशन पेंटेकोस्टल चर्चमध्ये अचानक एक व्यक्ती बंदुक घेऊन शिरला होता आणि तो स्टेजवर जाऊन लोकांना धमकी देत होता.

US : Man put gun on people in church pastor acted like real hero | VIDEO : चर्चमधील लोकांवर अचानक ताणली 'त्याने' पिस्तुल, पादरींनी रिअल हिरो बनून वाचवला सर्वांचा जीव

VIDEO : चर्चमधील लोकांवर अचानक ताणली 'त्याने' पिस्तुल, पादरींनी रिअल हिरो बनून वाचवला सर्वांचा जीव

googlenewsNext

एका चर्चच्या पादरींची सोशल मीडियावर सध्या जोरदार चर्चा होत आहे. नुसतीच चर्चाच नाही तर त्यांचं कौतुकही केलं जात आहे. कारण त्यांनी आपल्या जीवावर खेळून अनेक लोकांचा जीव वाचवला आहे. अमेरिकेतील नाशविले लाइट मिशन पेंटेकोस्टल चर्चमध्ये अचानक एक व्यक्ती बंदुक घेऊन शिरला होता आणि तो स्टेजवर जाऊन लोकांना धमकी देत होता. 

ही व्यक्ती चर्चमधील लोकांवर बंदुक ताणत त्यांना धमकी देत असल्याचं व्हिडीओमध्ये दिसत आहे. या दरम्यान पादरी Ezekiel Ndikumana यांनी परिस्थितीत सांभाळत त्या बंदुकधारी व्यक्तीला मागून धक्का दिला आणि त्याला खाली पाडलं. त्यानंतर सर्वांनी त्याला धरलं. त्यामुळे मोठी दुर्घटना टळली, अनेकांचा जीव वाचला.

ते म्हणाले की, 'तो व्यक्ती अचानक स्टेजवर आला आणि त्याने त्याची बंदुक काढली. यावेळी मी आधी खूप कन्फ्यूज झालो, समजलं नाही की, काय करावं. त्याने सर्वांकडे बंदुक ताणली होती. मला वाटलं आज काहीतरी अनर्थ होणार. मला कुणालाच काही होऊ द्यायचं नव्हतं. मला लगेच काहीतरी करायचं होतं, ते मी केलं'.

ज्या व्यक्तीने हा कारनामा केला त्याचं नाव Dezire Baganda आहे. तो चर्चचा मेंबर नाही. पण तो याआधी अनेकदा चर्चमध्ये आला आहे. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं आहे. लोकांनी व्हिडीओवर कमेंट करत पादरीला रिअर हिरो म्हटलं आहे. लोक म्हणाले की, जर त्यांनी लगेच काही केलं नसतं तर मोठी घटना घडू शकली असती.
 

Web Title: US : Man put gun on people in church pastor acted like real hero

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.