रोबोटला तुमचा चेहरा वापरण्याची परवानगी द्या आणि मिळवा १.५ कोटी रूपये; कंपनीची अजब ऑफर
By ऑनलाइन लोकमत | Published: November 27, 2021 03:19 PM2021-11-27T15:19:17+5:302021-11-27T15:21:22+5:30
Permission to Use Face on Robot : एका रोबोट बनवणाऱ्या कंपनीने एक अजब ऑफर काढली आहे. जर तुम्ही तुमच्या चेहऱ्याचा वापर रोबोटसाठी करण्यास परवानगी देत असाल तर कंपनी तुम्हाला १.५ कोटी रूपये देऊ शकते.
सर्वांनाच माहीत आहे की, जगभरात वेगवेगळ्या कामांसाठी रोबोट्सची निर्मिती केली जात आहे. खासकरून अमेरिकेत यावर जास्त प्रमाणात रिसर्च केले जातात. लवकरच मॉल्स, दुकानांमध्येही रोबोट तुमच्यासाठी सेवेसाठी हजर राहणार आहेत. अशात एका रोबोट बनवणाऱ्या कंपनीने एक अजब ऑफर काढली आहे. जर तुम्ही तुमच्या चेहऱ्याचा वापर रोबोटसाठी करण्यास परवानगी (Permission to Use Face on Robot) देत असाल तर कंपनी तुम्हाला १.५ कोटी रूपये देऊ शकते.
अमेरिकेतील (America) रोबोटिक कंपनी प्रोमोबॉट (Promobot) काही वॉलेंटिअर्सच्या शोधात आहे. कंपनी काही रोबोट तयार करत आहे. ज्यांना कंपनी व्यक्तीचे चेहरे लावणार आहेत. कंपनीने सांगितलं की, जर कुणी आपला चेहरा रोबोटवर वापरण्याची परवानगी देतील तर त्यांनी दीड कोटी रूपये मिळतील. व्यक्तीला फक्त त्यांचा चेहरा वापरण्याचे राइट्स द्यावे लागतील.
एअरपोर्ट, मॉल्समध्ये दिसतील रोबोट
२०२३ पर्यंत व्यक्तीचा चेहरा असलेला रोबोट मॉल्स, एअरपोर्ट, हॉटेल इत्यादी ठिकाणी दिसू शकतो. कंपनीद्वारे तयार करण्यात येणाऱ्या ह्यूमनॉइड रोबोट असिस्टंट फार अनोखा असेल, जो आवश्यक ठिकाणी लोकांच्या सेवेसाठी आणला जाईल. डेली स्टारच्या रिपोर्टनुसार, कंपनीने ही ऑफर सध्या केवळ इंग्लंडमधील लोकांसाठी ठेवली आहे. परमिशन देणाऱ्या व्यक्तीचा चेहरा अमेरिका आणि मिडल ईस्टमध्ये दिसेल.
आधीही बनले आहेत असे रोबोट्स
कंपनीकडून सांगण्यात आले आहे की, कंपनी फेशिअल रिकगनिश, स्पीच, ऑटोनॉमस नॅविगेशन आणि आर्टिफिशिअल इंटेलिजन्सच्या दिशेने काम करत आहे. कंपनीने सांगितलं की, आम्ही २०१९ पासून ह्यूमनॉइड रोबोट तयार करण्याच्या दिशेने काम करत आहोत. आमचा नवा क्लाएंट लार्ज स्केल प्रोजेक्टवर काम करत आहे. ज्यासाठी त्यांना रोबोट्स हवे आहेत.
त्यांना विना परवानगी चेहरा वापरून कायद्याच्या अडचणीत अडकायचं नाही. चेहरा परवानगीसाठी अप्लाय करणाऱ्या लोकांचं वय किती आणि कोणत्याही लिंगांचे असू शकतात. तुम्हाला आश्चर्य वाटेल की, कंपनीचे रोबोट आतापर्यंत ४३ देशात काम करत आहेत.