डाळ-भात नाही तर भींतीचा चुना खाते ही महिला, शेजारीही झाले हैराण
By ऑनलाइन लोकमत | Published: October 27, 2021 06:16 PM2021-10-27T18:16:34+5:302021-10-27T18:22:36+5:30
निकोलने सांगितलं की, तिला कोरड्या भींतीचा वास खूप आवडतो. सोबतच त्याचं टेक्सचर आणि टेस्टही तिला आवडते.
कोणत्याही गोष्टीची सवय वाईट असते. मग ते हेल्दी राहण्याचीही सवय का असेना. पण अनेकदा लोकांना विचित्र सवयी लागतात. याचच एक उदाहरण अमेरिकेतील मिशिगनमध्ये राहणारी निकोल आहे. निकोलला चॉक म्हणजेच खडू खाण्याची सवय आहे. ही सवय फारच वाढली. ज्यामुळे ती आता घराची भींत खाऊ लागली. आज अशी स्थिती आहे की, निकोल दिवसातून ६ वेळा घराच्या भींतीचा चुना काढून खाते.
निकोलने सांगितलं की, तिला कोरड्या भींतीचा वास खूप आवडतो. सोबतच त्याचं टेक्सचर आणि टेस्टही तिला आवडते. निकोलला ही टेस्ट इतकी आवडते की, आठवड्यातून ३.२ स्क्वेअर फूट भींत खाऊन टाकते. एका मुलाची आई असलेल्या निकोलने सांगितलं की, तिचं जेव्हा मन होतं तेव्हा ती भींत खाऊ लागते. आपल्या घराची भींत असो वा मैत्रिणीच्या घराची. ती मित्रांच्या घरीही भींत खाते.
निकोलने पुढे सांगितलं की तिची चॉक खाण्याची सवय ५ वर्षात बदलली. तेव्हा तिच्या आईचं निधन झालं होतं. कुणालाच माहीत नव्हतं की, आई जाण्याच्या दु:खात निकोल भींत खाऊ लागली होती. याची तिला लाजही वाटत होती. पण तरीही ती स्वत:ला आवरू शकलेली नाही. निकोल म्हणाली की, तिला वेगवेगळ्या प्रकारच्या भींती टेस्ट करणं आवडतं.
आपल्या आवडत्या भींतीबाबत निकोलने सांगितलं की, तिला दानेदार भींत फार आवडते. यात एक क्रंच असतं. या सवयीचा खुलासा झाल्यावर डॉक्टरांनी तिला इशारा दिला आहे. भींतीवरील पेंटमधील केमिकल्समुळे तिला कॅन्सरसारखा आजार होण्याची शक्यता आहे. यामुळे तिच्या इंटेस्टाइनमध्येही मोठी समस्या होऊ शकते. पण निकोल स्वत:वर कंट्रोल करू शकत नाही. तिने अनेकदा ही सवय सोडण्याचा प्रयत्न केला. पण तिला यश मिळालं नाही. तेच डॉक्टरांनी तिला सांगितलं की, तिने हे थांबवलं नाही तर तिच्या जीवालाही धोका होऊ शकतो.