शहरी जगणं सोडून जंगलात राहू लागला, निसर्गाच्या सानिध्यात बनवलं खास घर

By ऑनलाइन लोकमत | Published: May 26, 2023 09:39 AM2023-05-26T09:39:12+5:302023-05-26T09:41:42+5:30

अमेरिकेतील एका व्यक्तीने त्याच्या याच शहरातील जगण्याला रामराम केला आणि तो जंगलात जाऊन राहू लागला. त्याने जंगलात त्याच्यासाठी एक खास घर बनवलं.

USA man left job in city start living in tree house in jungle in Hawaii | शहरी जगणं सोडून जंगलात राहू लागला, निसर्गाच्या सानिध्यात बनवलं खास घर

शहरी जगणं सोडून जंगलात राहू लागला, निसर्गाच्या सानिध्यात बनवलं खास घर

googlenewsNext

लोकांना आजकालचं धावपळीचं जीवन पसंत येत आहे किंवा असं म्हणू शकतो की, लोकांना याची सवय झाली आहे. त्यामुळे त्यांना शांत आणि स्थिर जीवनाबाबत माहीतच नाही. त्यांना महानगरात राहून हे माहीतच नाही की, निसर्गाच्या सानिध्यात राहणं काय असतं. स्वच्छ हवा, पाणी मिळणं काय असतं. अमेरिकेतील एका व्यक्तीने त्याच्या याच शहरातील जगण्याला रामराम केला आणि तो जंगलात जाऊन राहू लागला. त्याने जंगलात त्याच्यासाठी एक खास घर बनवलं.

मेट्रो वेबसाइटनुसार उत्तर कॅलिफोर्निया (North California) मध्ये राहणारा 35 वर्षीय रॉबर्ट ब्रेटन (Robert Breton) एक सुपरमार्केटमध्ये कॅशिअरची नोकरी करत होता. त्याचं काम चांगलं सुरू होतं. पण त्याला काहीतरी मिसिंग वाटत होतं. त्यामुळे त्याने नोकरी सोडली आणि तो हवाईच्या जंगलांमध्ये निघून गेला. त्याने हवाईच्या जंगलाची निवड केली.

त्याने 2020 मध्ये टिकटॉकच्या कमाईतून जमिनीचा छोटा तुकडा 24 लाख रूपयांमध्ये खरेदी केला आणि तिथे ट्री हाऊस बनवलं. ज्यात तो आता राहत आहे. तो म्हणाला की, आता त्याला जुन्या जगण्यातील कोणतीच गोष्ट आठवत नाही. रॉबर्ट त्याच्या जगण्याच्या छोट्या छोट्या गोष्टी सोशल मीडियावर शेअर करत असतो.

इन्स्टावर त्याला 1 लाखांपेक्षा जास्त लोक फॉलो करतात. व्हिडिओच्या माध्यमातून तो हे दाखवतो की, तो भाजीपाला कसा उगवतो. कसं पाणी साठवतो. तो म्हणतो की, तो शहरापासून दूर एक शुद्ध जीवन जगत आहे. 

View this post on Instagram

A post shared by Robert Breton (@theinfinitecup)

हे करून तो निसर्गाच्या खूप जवळ आहे. अनेक व्हिडिओत तो शेती करताना, समुद्र किनारी बसून मासे पकडताना दिसत आहे. बरेच लोक त्याच्यावर टिका करतात की, तो सोशल मीडियाशी जुळलेला आहे म्हणून तो पूर्णपणे शहरी आयुष्यापासून दूर नाही. यावर त्याने उत्तर दिलं की, याच माध्यमातून तो लोकांना त्याच्या जगण्याबाबत सांगू शकतो आणि प्रेरित करू शकतो.

Web Title: USA man left job in city start living in tree house in jungle in Hawaii

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.