टॉयलेटमध्ये मोबाईल वापरणं पुरुषांसाठी घातक! डॉक्टरांनी केलं सावध, कारणही सांगितलं

By ऑनलाइन लोकमत | Published: April 10, 2023 08:50 PM2023-04-10T20:50:38+5:302023-04-10T20:57:52+5:30

नुकतेच एका संशोधनाच्या माध्यमाने, डॉक्टरांच्या एका चमूने यासंदर्भात सविस्तर अहवाल सादर केला आहे. खरेतर हा अहवाल प्रत्येकानेच वाचायला हवा.

Using mobile phones in the toilet is dangerous for men The doctor warned and told the reason | टॉयलेटमध्ये मोबाईल वापरणं पुरुषांसाठी घातक! डॉक्टरांनी केलं सावध, कारणही सांगितलं

टॉयलेटमध्ये मोबाईल वापरणं पुरुषांसाठी घातक! डॉक्टरांनी केलं सावध, कारणही सांगितलं

googlenewsNext

सध्या मोबाईल फोन हा आपल्या जीवनाचा एक अत्यंत महत्त्वाचा भाग होऊन बसला आहे. अनेक जण तर, अगदी टॉयलेटमध्ये जातानाही मोबाईल फोन सोबतच ठेवतात. पण, टॉयलेटमध्ये मोबाईल वापरणे पुरुषांसाठी घातक ठरू शकते, हे आपल्याला माहीत आहे का? नुकतेच एका संशोधनाच्या माध्यमाने, डॉक्टरांच्या एका चमूने यासंदर्भात सविस्तर अहवाल सादर केला आहे. खरेतर हा अहवाल प्रत्येकानेच वाचायला हवा. तर जाणून घेऊयात काय आहे या अहवालात...

मोबाइल फोन वापरणे घातक! -
डेली मेलने आपल्या एका वृत्तात इंडियाना युनिव्हर्सिटीतील वैज्ञानिकांचा हवाला देताना यासंदर्भात माहती दिली आहे. संबंधित वृत्तानुसार, युनिव्हर्सिटीतील आरोग्य विभागातील यूरोलॉजिस्ट डॉ हेलेन बर्नी यांनी पुरुषाना इशारा देताना, टॉयलेटमध्ये मोबाइल फोन वापरणे किती घातक होऊ शकते, हे सांगितले आहे. याच बरोबर, एक सर्वेक्षणाच्या माध्यमाने 9800 वयस्कच लोकांपैकी 65 टक्के लोक टॉयलेटमध्य मोबाइल फोन वापरतात, असेही रिपोर्ट मध्ये सांगण्यात आले आहे.

सांगण्यात आले आहे की, टॉयलेटमध्ये बॅक्टीरिया बरेच दिवस राहतात. पुरुष यूरिन करत्यावेळी फोन वापरताना बॅक्टेरिया आणि व्हायरस फोनपर्यंत पोहोचण्याची मोठी शक्यता असते. याच बरोबर फ्लश करताना 57 टक्के बॅक्‍टेरियाचे कन 5.5 सेकंदांत मोबाइलपर्यंत पोहोचू शकतात. हे अनेक दिवस राहतात आणि आपल्याला आजारी करू शकतात. याशिवाय, यामुळे इतर घातक आजारही होऊ शकतात. जे जीवघेणेही ठरू शकतात.

संबंधित वृत्तानुसार, डॉ बर्नी असेही म्हणाल्या की, अशा प्रकारे मोबाईलच्या माध्यमाने धोकादायक जंतू आणि बॅक्टेरिया आपल्यापर्यंत पोहोचतात. खरे तर, केवळ पुरुषच नाही, तर कुणासाठीही टॉयलेटमध्ये मोबाइल फोन वापरणे योग्य नाही.

Web Title: Using mobile phones in the toilet is dangerous for men The doctor warned and told the reason

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.