तब्बल ८४ वर्षानंतर नैनीतालमध्ये दिसला लाल रंगाचा दुर्मिळ साप; खासियत वाचून चकित व्हाल
By ऑनलाइन लोकमत | Published: August 9, 2020 05:51 PM2020-08-09T17:51:30+5:302020-08-09T17:53:16+5:30
नैनीतालच्या एका घरात सापडलेल्या सापाला वनविभागाच्या टिमने ताब्यात घेतलं आहे.
आतापर्यंत सापाच्या अनेक प्रजाती तुम्ही ऐकून असाल. साप म्हटलं की अनेकांचा थरकाप उडतो. भारतातील उत्तराखंड राज्याच्या नैनीतालमध्ये दुर्मीळ प्रजातीचा साप आढळून आला आहे. विशेष म्हणजे हा साप कुठल्याही जंगलातून नाही तर एका घरात सापडला आहे. या दुर्मीळ सापाला 'कोरल कुकरी' असं म्हटलं जातं. या प्रजातीच्या सापाचा रंग लाल असतो. नैनीतालच्या एका घरात सापडलेल्या सापाला वनविभागाच्या टिमने ताब्यात घेतलं आहे.
वनअधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार असा दुर्मीळ साप १९३६ मध्ये उत्तर प्रदेशाच्या लखीमपुर खीरी क्षेत्रात दिसून आला होता. त्यानंतर वन जीवतज्ज्ञांनी या सापचे नाव 'ओलिगोडोन खेरिएन्सिस' असं ठेवलं आहे. या सापाला कुकरी म्हणतात कारण नेपाळच्या गोरखांमध्ये कुकरीला चाकू असं म्हणतात. या सापाचे दात कुकरी किंवा ब्लेडप्रमाणे धारधार असतात.
या सापाबाबत माहिती देत असताना प्रभागिय अधिकारी (DFO) नीतीश मणि त्रिपाठी यांनी सांगितले की, गौला वन रेंज टीमकडे नैनिताल जिल्ह्यातील कुरयिया खट्टा गावातील निवासी कविंद्र कोरंहा यांनी शुक्रवारी सकाळी मदत मागितली. वनअधिकारी जेव्हा त्या ठिकाणी पोहोचले तेव्हा ग्रामीण भागातील लोकांनी सापाला पकडून प्लास्टिकच्या पिशवीत बंद केलं होतं. त्रिपाठी यांनी दिलेल्या माहितीनुसार हा साप दुर्मीळ सापांपैकी एक आहे.
देहरादूनमधील वाइल्डलाइफ इंस्टीट्यूट ऑफ इंडिया (WII) चे वन्यजीव तज्ज्ञ विपुल मौर्य यांनी सांगितले की लाल कोरल कुकरी दुर्मिळ साप असून आतापर्यंत फक्त दोनवेळा हा साप दिसून आला आहे. या सापाचे दात शस्त्राप्रमाणे धारधार आहेत.
हे पण वाचा-
दारू सोडण्यासाठी वापरलं जाणारं औषध, आता कोरोनाविरोधात ठरणार उपयोगी; वैज्ञानिकांचा दावा
लढ्याला यश! कोरोनाला नष्ट करण्यासाठी 'चमत्कारीक लस' तयार; 'या' देशातील तज्ज्ञांचा दावा
युद्ध जिंकणार! कोरोनाचं नवीन औषध 'एविप्टाडील' आलं; फक्त ४ दिवसात प्रभावी ठरणार, तज्ज्ञांचा दावा
CoronaVaccine : सीरम इन्स्टिट्यूटसोबत बिल गेट्स यांचा मोठा करार; 10 कोटी डोस गरिबांना देणार
मोठा दिलासा! सीरम इन्स्टिट्यूटनं जाहीर केली लसीची किंमत, फक्त २२५ रुपयांत मिळणार कोरोना लस