Valentine Day: 14 फेब्रुवारीला 'व्हॅलेंटाईन डे'ऐवजी 'Cow Hug Day' साजरा करा, अॅनिमल वेलफेअर बोर्डाचे आवाहन
By ऑनलाइन लोकमत | Published: February 8, 2023 03:59 PM2023-02-08T15:59:49+5:302023-02-08T16:00:18+5:30
देशात गायींना मोठे महत्व आहे, त्यामुळे या दिवशी गायींना मिठी मारण्याचे आवाहन बोर्डाने केले.
Cow Hug Day: फेब्रुवारी (February) महिन्याला मंथ ऑफ लव्ह (Month of Love) म्हणजेच प्रेमाचा महिना म्हटले जाते. याच महिन्यात प्रेमी युगुलांसाठीचा 'व्हॅलेंटाईन डे' साजरा केला जातो. 'व्हॅलेंटाईन डे'(Valentine Day) ला प्रेमाचा दिवस म्हटले जाते. हा दिवस 14 फेब्रुवारीला असतो, पण 7 फेब्रुवारीपासूनच याची सुरुवात होते. दररोज एक खास दिवस असतो.
दरम्यान, 14 फेब्रुवारीला 'व्हॅलेंटाईन डे'ऐवजी गायींना मिठी मारण्याचा दिवस साजरा करावा, अशी मागणी करण्यात आली आहे. या महिन्यात प्रेमी युगुलांवर प्रेमाची नशा चढलेली असते. 7 फेब्रुवारीपासून 14 फेर्बुवारीपर्यंत कपल्स पत्येक दिवस खासरित्या साजरा करतात. पण, अॅनिमल वेलफेअर बोर्डाने 14 फेब्रुवारीला 'व्हॅलेंटाईन डे'ऐवजी काउ हग डे (Cow Hug Day) म्हणजेच गायींना मिठी मारण्याचा दिवस म्हणून साजरा करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.