10 रूपयात गर्लफ्रेंड, 3 हजारात बॉयफ्रेंड; व्हॅलेंटाईन डे ला वस्तूंसारखे भाड्याने मिळतात बॉयफ्रेंड-गर्लफ्रेंड!
By ऑनलाइन लोकमत | Published: February 14, 2023 01:47 PM2023-02-14T13:47:59+5:302023-02-14T13:48:29+5:30
Valentines Day 2023 : प्रेमाच्या जादूत हरवलेल्या प्रत्येक जोडप्याला तुम्ही प्रेमी समजण्याची चूक करू नका. यातही मोठा झोल असतो. कारण शो ऑफवर जगत असलेल्या दुनियेत आता बॉयफ्रेंड आणि गर्लफ्रेंडही भाड्याने मिळते.
Valentines Day 2023 : जे लोक प्रेमात पडले आहेत त्यांच्यासाठी व्हॅलेंटाईन डे चं फार महत्वं असतं. पण सिंगल लोकांचं काय? या लोकांसाठीही काहीना काही उपाय आजकाल उपलब्ध झाले आहेत. तुम्ही ऑनलाईन वेगवेगळ्या गोष्टी ऑर्डर करत असता. तसे तुम्ही आता ऑनलाईन बॉयफ्रेंड-गर्लफ्रेंडही मागवू शकता. तेही कमिटमेंट नसणारे.
प्रेमाच्या जादूत हरवलेल्या प्रत्येक जोडप्याला तुम्ही प्रेमी समजण्याची चूक करू नका. यातही मोठा झोल असतो. कारण शो ऑफवर जगत असलेल्या दुनियेत आता बॉयफ्रेंड आणि गर्लफ्रेंडही भाड्याने मिळते. एक दिवस प्रेम दाखवायचं आणि नंतर पैसे घेऊन आपल्या मार्गाने निघून जायचं. अनेक देशात बॉयफ्रेंड-गर्लफ्रेंड भाड्याने मिळतात.
10 रूपयात गर्लफ्रेंड भाड्याने मिळते?
भाड्याने गर्लफ्रेंड मिळवण्याचं चलन अजून आपल्या देशात आलेलं नाही. पण शेजारी देश चीनमध्ये 2018 पासूनच लोकांमध्ये शो ऑफ करण्यासाठी गर्लफ्रेंड भाड्याने घेण्याचा सिलसिला सुरू झाला आहे. त्यावेळी 20 मिनिटांच्या सेवेसाठी 10 रूपये चार्ज केले जात होते आणि ही सेवा शॉपिंग मॉलमध्येही होती. द सनच्या एका रिपोर्टनुसार, स्टॅंडवर मॉडल 10-15 मॉडल्स असायच्या. ज्यातील एकीला 20 मिनिटांसाठी 10 रूपयांमध्ये हायर केलं जात होतं. त्यांना स्पर्श करणे किंवा मॉलच्या बाहेर नेण्याची परवानगी नव्हती.
App वरही आली हे सेवा
आता तर गर्लफ्रेंडची सेवा अॅपवरही आली आहे. चीन आणि जपानमध्ये सहजपणे अॅपच्या माध्यमातून तुम्ही तुमच्यासाठी गर्लफ्रेंड भाड्याने मिळवू शकता. त्यांच्या खाणं-पिणं, फिरणं करू शकता आणि पैसे देऊन त्यांना घरी सोडू शकता. अशीच सेवा बॉयफ्रेंडसाठीही आहे. तुम्हाला हवा तसा बॉयफ्रेंड मिळू शकतो. जपानमध्ये सहजपणे तुम्ही अॅपच्या माध्यमातून गर्लफ्रेंड भाड्याने घेऊ शकता. जपानमध्ये एका तासासाठी बॉयफ्रेंड भाड्याने घेण्यासाठी 5000 जपानी येन म्हणजे 3000 रूपये द्यावे लागतात. गरज पडली तर पूर्ण परिवारही तुम्ही भाड्याने घेऊ शकता.
भारतात भाड्याने मिळतात बॉयफ्रेंड
ज्या तरूणींना कमिटमेंट करायची नसते, त्या आपल्या देशातही काही तासांसाठी बॉयफ्रेंड बुक करू शकतात. 2018 मध्येच ‘Rent a Boy | Friend’ नावाने एका अॅपची सुरूवात झाली होती. 2022 मध्ये अशा अॅपची सुरूवात झाली. ज्याद्वारे तरूणी आपलं मन हलकं करण्यासाठी बॉयफ्रेंड हायर करू शकतात.
मिठी देऊन आनंद देण्याची सेवा
तशी तर आपल्या देशात सतत मिठ्या मारल्या जातात. पण परदेशात याचीही सेवा आहे. जपानमध्ये 2011 मध्ये अशी सेवा सुरू झाली. ज्यासाठी 7 तासांपासून ते 12 तासांचं मेन्यू कार्ड होतं. यासाठी 17 हजार रूपयांपासून ते 30 रुपयांपर्यंत चार्ज केला जात होता.