शाकाहारींचा देश...भारत!

By admin | Published: January 12, 2017 12:50 AM2017-01-12T00:50:26+5:302017-01-12T00:50:26+5:30

संयुक्त राष्ट्रांच्या आकडेवारीनुसार (२००७) जगभरात सर्वाधिक शाकाहारी लोक भारतात आहेत.

Vegetarian country ... India! | शाकाहारींचा देश...भारत!

शाकाहारींचा देश...भारत!

Next

संयुक्त राष्ट्रांच्या आकडेवारीनुसार (२००७) जगभरात सर्वाधिक शाकाहारी लोक भारतात आहेत. एवढेच नव्हे, तर जगात जेवढे शाकाहारी लोक आहेत त्यांची संख्या एकत्र केली तरी भारतातील शाकाहारींची संख्या त्याहून अधिक भरेल.भारतातील बहुसंख्य हॉटेल्स, खाणावळी, रेस्टॉरंट्स, उपहारगृहे ही शाकाहारी, फक्त शाकाही किंवा मांसाहारी, असे स्पष्टपणे लिहिलेली असतात. शाकाहारी उपहारगृहे ही मोठ्या संख्येने असतात व मांसाहार उपलब्ध असलेल्या उपहारगृहांत शाकाहाराचीही सोय असल्याचे स्पष्टपणे लिहिलेले असते. २००६ मध्ये झालेल्या पाहणीनुसार ३१ टक्के भारतीय हे शाकाहारी होते. नऊ टक्के हे अंडीही खाणारे होते. लिंगायत, वैष्णव, जैन व ब्राह्मण यांच्यातील ५५ टक्के लोक शाकाहारी दिसतात. मुस्लिमांत व समुद्र किनारी भागात राहणाऱ्यांपैकी फक्त तीन टक्के शाकाहारी आहेत. जे भारतीय मांसाहारी असल्याचे सांगतात, त्यांच्यापैकी अनेक जण हे कधी तरीच खाणारे आहेत तर ३० टक्केच लोक नियमित मांसाहार करतात.  भारत सरकारने २०११ मध्ये केलेल्या जनगणनेमध्ये एकूण लोकसंख्येच्या २८-२९ टक्के लोक शाकाहारी असल्याचे दिसले. त्या  आधीच्या दशकात केलेल्या जनगणनेच्या  तुलनेत ताज्या पाहणीत शाकाहारी  लोकांची संख्या वाढली आहे.  म्हणजेच भारतात शाकाहारींचे  प्रमाण वाढताना  दिसत आहे.

Web Title: Vegetarian country ... India!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.