व्हेनेझुएलातील अन्नधान्यटंचाई प्राण्यांच्या मुळावर!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 16, 2017 01:14 AM2017-09-16T01:14:52+5:302017-09-16T01:15:11+5:30
व्हेनेझुएलाच्या पश्चिमेकडील झुलिया राज्यात प्राणिसंग्रहालयातील प्राण्यांच्या झालेल्या चोरीचा तपास अधिकारी करीत आहेत. परंतु चोरीला गेलेले प्राणी मारून खाल्ले गेल्याची शक्यता आहे. व्हेनेझुएलात सध्या प्रचंड अन्नटंचाई असून, त्यामुळे असे प्रकार घडत आहेत.

तिथे अन्नधान्यासाठी मोर्चे निघत आहेत. दुकाने, सुपरमार्केट लुटली जात आहेत. कचºयात पडलेल्या भाज्या, फळे व अन्न गोळा करण्यासाठी मध्यमवर्गीयही फिरत आहेत. घरातील फ्रिज रिकामे पडले आहेत. त्यामुळे मिळेल ते प्राणी पकडून खाल्ले जात आहेत. डुकरासारखे दिसणारे दोन प्राणी कोलंबियाच्या सीमेजवळ असलेल्या मराकायबो शहरातील प्राणिसंग्रहालयातून गेल्या महिन्यात चोरीला गेले. चोरट्यांनी ते प्राणी खाण्याच्या उद्देशानेच नेले, अशी शक्यता लुईस मोराल्स या अधिकाºयाने व्यक्त केली. सरकारच्या सामाजिक आर्थिक धोरणांमुळे देशात कमालीची अन्नधान्य टंचाई निर्माण झाली आहे व त्यातून कुपोषण होत आहे. पर्यायाने लक्षावधी लोक जेथे कुठे अन्न मिळेल ती जागा (कचराकुंड्या) शोधत आहेत. चोरीच्या या मालिकेत म्हशीही लांबवण्यात आल्या. त्या अमली पदार्थांच्या तस्करांनी विकण्यासाठी नेल्या.