Video - काय सांगता? ...अन् चक्क बाळासारखा रडू लागला 'हा' पक्षी; आवाज ऐकून बसेल आश्चर्याचा धक्का
By ऑनलाइन लोकमत | Published: September 5, 2021 11:39 AM2021-09-05T11:39:13+5:302021-09-05T11:44:50+5:30
Video bird crying like baby in australian zoo you will be shocked : प्राणीसंग्रहालयातील एक पक्षी चक्क बाळासारखा रडत असल्याचा एक व्हिडीओ सध्या जोरदार व्हायरल झाला आहे. पक्ष्याचा आवाज ऐकून आश्चर्याचा धक्का बसेल.
नवी दिल्ली - लहान मुलं रडायला लागली की लगेचच त्यांना शांत करण्याचा प्रयत्न केला जातो. पण तुम्हाला जर कोणी पक्षी लहान बाळासारखा रडतो असं सांगितलं तर सुरुवातीला विश्वासच बसणार नाही. पण हो हे खरं आहे. प्राणीसंग्रहालयातील एक पक्षी चक्क बाळासारखा रडत असल्याचा एक व्हिडीओ सध्या जोरदार व्हायरल झाला आहे. पक्ष्याचा आवाज ऐकून आश्चर्याचा धक्का बसेल. सोशल मीडियावर अनेक नवनवीन व्हिडीओ हे सातत्याने व्हायरल होत असतात. सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान हिट ठरला असून अनेकांना तो प्रचंड आवडला आहे.
सिडनीच्या टॅरोंगा प्राणीसंग्रहालयातील (Taronga Zoo) हे दृश्य आहे. या प्राणीसंग्रहालयाने आपल्या ट्विटर अकाऊंटवर हा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये पक्षी ओरडताना दिसत आहे. पण एखाद्या पक्ष्याच्या ओरडण्यासारखा त्याचा आवाज नाही तर चक्क एका लहान बाळाचा आवाज आहे. तो जेव्हा ओरडतो तेव्हा बाळाचा आवाज येतो. म्हणजेच बाळाच्या रडण्याचा आवाज या पक्ष्याच्या गळ्यातून बाहेर पडतो आहे.
Bet you weren't expecting this wake-up call! You're not hearing things, our resident lyrebird Echo has the AMAZING ability to replicate a variety of calls - including a baby's cry!
— Taronga Zoo (@tarongazoo) August 30, 2021
📽️ via keeper Sam #forthewild#tarongatv#animalanticspic.twitter.com/RyU4XpABos
आवाजाची नक्कल करण्यात तरबेज
lyrebird असं या पक्ष्याला म्हटलं जातं. जो वेगवेगळे आवाज काढण्यात म्हणजे आवाजाची नक्कल करण्यात तरबेज असतो. हा पक्षी आवाज बरोबर लक्षात ठेवतो आणि तसा हुबेहुब आवाज काढण्याचा सरावही करतो. या पक्ष्यानेही कदाचित असाच बाळाचा रडण्याचा आवाज ऐकला असावा आणि अगदी तसाच आवाज तो काढतो आहे अशी माहिती प्राणीसंग्रहालयाच्या सुपरवायजरने दिली आहे. सध्या हा व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.