व्हिडिओ काढताना पक्ष्याने चोरला कॅमेरा, त्यानंतर मिळाले ‘असे’ अप्रतिम फुटेज

By ऑनलाइन लोकमत | Published: December 20, 2017 11:38 AM2017-12-20T11:38:09+5:302017-12-20T11:47:55+5:30

व्हिडीयो काढण्यासाठी चालु असलेला कॅमेरा पक्ष्याने पळवून नेल्यानंतर त्यात अप्रतिम दृश् शुट झाली आहेत.

video captured by birds has incredible footage | व्हिडिओ काढताना पक्ष्याने चोरला कॅमेरा, त्यानंतर मिळाले ‘असे’ अप्रतिम फुटेज

व्हिडिओ काढताना पक्ष्याने चोरला कॅमेरा, त्यानंतर मिळाले ‘असे’ अप्रतिम फुटेज

Next
ठळक मुद्देखाता खाता सीगल ब्रेडसोबत कॅमेराही घेऊन उंच उडून गेला.मात्र त्यानंतरही कॅमेरा चालु होता आणि व्हिडिओ शूटिंग सुरूच होतं.तो जस-जसा उडू लागला तसं-तसं त्या कॅमेऱ्यात अत्यंत अप्रतिम व्हिडीयो शूट होऊ लागलं.

नॉर्वे : वाईल्डलाईफ फोटोग्राफी म्हणजे अंगी असलेल्या समयसुचकता आणि संयम या दोन्ही गुणांची परिक्षा. मनासारखा एखादा क्लिक मिळण्याकरता हे वाईल्डलाईफ फोटोग्राफर फार वेळ वाट पाहतात. एखाद्या प्राण्याचा किंवा पक्ष्याचा फोटो काढण्यासाठी त्यांना अनेक शक्कलाही लढवाव्या लागतात. कधी कधी ती काम करते कधी कधी वाया जाते. नॉर्वेतही असाच एक प्रकार घडलाय. पण हा अपघात फोटोग्राफरसाठीच महत्त्वाचा ठरला कारण त्याला हवे असलेले फुटेज या पक्ष्यानेच त्याला काढून दिले.

आणखी वाचा - शेफ विकास खन्नांनी पोस्ट केलेला फोटो व्हायरल, महिला हरणाला दूध पाजतानाचा टीपलं दृश्य 

एन.डी.टी.व्हीने दिलेल्या वृत्तानुसार, केजेल रॉबर्टसेन या फोटोग्राफरला सीगल या पक्षाचे काही फुटेज हवे होते. त्यासाठी त्याने आपल्या बाल्कनीत काही ब्रेडचे तुकडे ठेवले जेणेकरून तो पक्षी ते ब्रेड खाण्याच्या निमित्ताने बाल्कनीत येईल आणि केजेलला व्हिडिओ काढायला मिळेल. ब्रेडच्या जरा पुढे त्याने आपला कॅमेरा ठेवला होता ज्याने अगदी जवळून व्हिडीयो शुट होईल. पण झालं काहीतरी भलतंच. कारण सीगलला केवळ ब्रेडच नाही तर तो कॅमेराही हवा होता. म्हणून सीगल ब्रेडसोबत कॅमेराही घेऊन उंच उडू लागला. आकाशात उंचच उंच उडणाऱ्या या पक्षाच्या तोंडातून कॅमेरा कसा बरा काढायचा हा प्रश्नच होता. तब्बल 5 महिन्यांनंतर केजेल यांना त्यांचा कॅमेरा सापडला. पण कॅमेरा सापडल्यानंतर त्यांचा आनंद गगनात मावत नव्हता. कारण त्यांना अत्यंत अप्रतिम आणि सुरेख व्हिडिओ शूट मिळाले होते. पाहा व्हिडीयो - 

सीगल जेव्हा कॅमेरा घेऊन उडून गेला तेव्हा व्हिडिओ शूटिंग सुरूच होतं. त्यामुळे तो जस-जसा उडू लागला तसं-तसं त्या कॅमेऱ्यात अत्यंत अप्रतिम व्हिडीयो शूट होऊ लागलं. या व्हिडिओमुळे समुद्र आणि आकाशातीलमधील दरी नेमकी कशी दिसते हे समजलं. तसंच एखादा पक्षी किती उंच उडू शकतो याचीही माहिती मिळाली. थोड्या उशीराने का होईना पण अत्यंत अप्रतिम शूट त्याला मिळाल्याने फोटोग्राफरला भलताच आनंद झाला होता. कारण प्रत्यक्षात विचार करता कोणताही माणूस एवढ्या उंचावरून फोटो काढूच शकत नाही. त्यामुळे या सीगल पक्षाने फोटोग्राफरचं काम अगदी सोपं करून दिलं होतं. हे फुटेज मिळाल्यानंतर, जीप्रो या युट्यूब चॅनेलने हा व्हिडिओ प्रसारित केला. या व्हिडिओला आता लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. 

आणखी वाचा - आगीचे गोळे झेलणाऱ्या हत्तींच्या फोटोला सर्वोत्तम छायाचित्राचा पुरस्कार

Web Title: video captured by birds has incredible footage

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.