आयडियाची कल्पना! मोबाईलच्या बॉक्सपासून स्विच बोर्ड; हायटेक जुगाडचा Video तुफान व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Published: April 18, 2022 03:24 PM2022-04-18T15:24:56+5:302022-04-18T15:26:26+5:30
Video Desi Jugaad : टाकाऊपासून टिकाऊ गोष्टी देखील तयार केल्या जातात. नानाविध शक्कल लढवून वस्तू तयार होतात.
घरामध्ये अनेक निरुपयोगी वस्तू असतात. काही वेळा त्या तशाच पडून राहतात तर कधी आपण त्या फेकून देतो. पण अनेकदा टाकाऊपासून टिकाऊ गोष्टी देखील तयार केल्या जातात. नानाविध शक्कल लढवून वस्तू तयार होतात. भंगारात पडलेल्या गोष्टीपासून उपयोगी वस्तू बनवण्यासाठी कौशल्य लागते. असाच एक देशी जुगाडचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. यामध्ये कल्पनाशक्तीला चालना देऊन मोबाईलच्या बॉक्सला स्वीच बोर्ड बनवताना एक व्यक्ती दिसत आहे. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर तुम्हालाही तुमच्या घरात पडलेला बॉक्सचा वापर करायला आवडेल.
सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत असलेला हा व्हिडीओ पाहिल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की तुम्हीही तुमच्या घरात पडलेल्या मोबाईल बॉक्सचा योग्य वापर करू शकता. मोबाईल बॉक्सच्या आतमध्ये थो़डी जागा आहे, ज्यामध्ये स्विचेस आणि वायर्स सहजपणे एकत्र केले जाऊ शकतात. या व्हिडीओमध्ये दिसत आहे की, त्या व्यक्तीने मोबाईलच्या बॉक्समधून एक स्विच बोर्ड तयार केला आहे. तसेच एक्सटेंशन म्हणून देखील त्याचा वापर करता येईल. Vivo y71 च्या बॉक्सपासून तो तयार करण्यात आला.
दिसायलाही हा स्विच बोर्ड खूपच फंकी लूक देत आहे. हा देसी जुगाड पाहून लोक कौतुक करत आहेत. व्हिडीओ पाहिल्यानंतर एका युजरने ओह माय गॉड, तर दुसऱ्या युजरने मोबाईल बॉक्सचा योग्य वापर असे लिहिले. हा व्हिडीओ आयबी टेक्निकल नावाच्या अकाऊंटने यूट्यूबवर शेअर केला आहे. त्याच्या कॅप्शनमध्ये मोबाईल बॉक्सचे एक्स्टेंशन बोर्ड कसे बनवायचे असे लिहिले आहे. सोशल मीडियावर लोक या व्हिडीओला खूप लाईक करत आहेत. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.