Video: अबब! घरात १० फूटाचा किंग कोब्रा घुसला, बघणाऱ्यांना घाम फुटला, मग...

By ऑनलाइन लोकमत | Published: January 20, 2022 05:07 PM2022-01-20T17:07:22+5:302022-01-20T17:07:54+5:30

जेव्हा साप पकडणारी टीम घरी पोहचली तेव्हा त्यांनी सापाला पाहताच हैराण झाले.

Video: Found 10-ft-long king cobra out of a family’s kitchen in Thailand | Video: अबब! घरात १० फूटाचा किंग कोब्रा घुसला, बघणाऱ्यांना घाम फुटला, मग...

Video: अबब! घरात १० फूटाचा किंग कोब्रा घुसला, बघणाऱ्यांना घाम फुटला, मग...

Next

कोब्रा साप म्हटलं तर भल्याभल्यांना घाम फुटतो. क्रोबा हा जगातील सर्वात विषारी सापांपैकी एक आहे. विशेष म्हणजे हा साप सहसा जंगलात आढळतो. परंतु काहीवेळा तो जंगलाच्या आसपास राहणाऱ्या घरातही जातो. क्रोबा सापाचे अनेक व्हिडीओ तुम्ही पाहिले असतील. कुठल्याही मानवी वस्तीत साप शिरला तर सर्पमित्रांना बोलावून त्याला पकडलं जातं आणि पुन्हा जंगलात सोडलं जातं.

थायलँडमध्येही एका घरात कोब्रा साप आला. जेव्हा हा साप घरात आला तेव्हा घरातील सर्व सदस्य घरातच होते. न्यूजफ्लेअरच्या वृत्तानुसार, ही घटना १५ जानेवारीची आहे. २९ वर्षीय Phawinee Nagmaprom यांच्या घरात जवळपास १० फूट लांबीचा कोब्रा साप घुसला. तेव्हा घरातील एका लहान मुलाची नजर त्या सापावर पडली. मुलगा जोरजारात ओरडायला लागला तेव्हा घरातील इतर सदस्य धावत आले. त्यांनी सापाला पाहताच सगळेच घाबरले. तेव्हा घरमालकाने साप पकडणाऱ्या टीमशी संपर्क साधून त्यांना बोलावलं.

जेव्हा साप पकडणारी टीम घरी पोहचली तेव्हा त्यांनी सापाला पाहताच हैराण झाले. हा साप घरातील स्वयंपाक घरात होता आणि सगळेच सदस्यही तिथेच हजर होते. एका कपाटामागे साप लपला होता. जर चुकुनही जर कुठल्या सदस्याला हा साप चावला असता तर तो जिवंत राहण्याची शक्यता फारच कमी होती. घरातील इतर सदस्यांना सुखरुप स्वयंपाक घरातून बाहेर काढत सर्पमित्रांच्या पथकाने १५ मिनिटांच्या थरारानंतर त्या सापाला पकडलं.

घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

या घटनेचा व्हिडिओ जेव्हा सोशल मीडियावर व्हायरल झाला. तेव्हा या सापाची लांबी पाहून अनेकांनी चिंता व्यक्त केली. व्हिडीओत हा साप फणा काढून पकडणाऱ्या व्यक्तीच्या दिशेने जात असल्याचं दिसून येते. साप खूप रागात असल्याचं व्हिडिओत पाहायला मिळतं. त्यानंतर या सापाला पकडून जंगलात सोडलं जातं. तर घरमालकाचं म्हणणं आहे की, त्यांच्या घरी साप आला हे भाग्याचं आहे. ते लवकरच ५९ नंबरची लॉटरी तिकीट खरेदी करणार असल्याचं ते म्हणाले.

Web Title: Video: Found 10-ft-long king cobra out of a family’s kitchen in Thailand

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :snakeसाप