Video: वाहतूक पोलिसाची गांधीगिरी, चालानऐवजी मंत्रोच्चारासह बाइकस्वाराला हेल्मेट घातले...
By ऑनलाइन लोकमत | Published: September 11, 2022 04:56 PM2022-09-11T16:56:45+5:302022-09-11T16:57:33+5:30
Police Trending Video: वाहतुकीच्या नियमाबाबत पोलिसांकडून अनेकदा वेगळ्या पद्धतीने जनजागृती केली जाते.
Police Trending Video: दररोज रस्ते अपघातात शेकडो लोकांना आपला जीव गमवावा लागतो. अतिवेगाने वाहन चालवणे, ओव्हरटेक करणे किंवा रॅश ड्रायव्हिंग करणे, या कारणांमुळे अपघात होतो. अनेकवेळा हेल्मेट न घातल्यामुळेही चालकाचा जीव जातो. त्यामुळेच वाहतूक पोलीस हेल्मेट न घालणाऱ्यांचा चालान कापतात. यातच एका पोलिसाचा गांधीगिरीचा व्हिडिओ व्हायरल होतोय.
वाहतुकीच्या नियमाबाबत जनजागृती करण्यासाठी पोलिस विभाग वेगवेगळ्या युक्त्या आमलात आणत असते. अनेकदा पोलीस चालान कापण्याची मोहिम राबवतात. यादरम्यान अनेकांचा पोलिसाशी वादही होतो. हेल्मेट नसल्यामुळेही पोलीस दंड आकारतात, पण सध्या एक व्हिडिओ व्हायरल होतोय. या व्हिडिओत पोलीस कर्मचारी दंड न आकारता चालकाला हेल्मेट देताना दिसत आहेत. विशेष म्हणजे, यावेळी पोलीस कर्मचारी मंत्रांचा उच्चार करतोय. या अनोख्या पद्धतीच्या जनजागृतीमुळे त्या पोलिसाचे सर्वत्र कौतुकही होत आहे.
पहा व्हिडिओ:-
व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये वाहतूक पोलीस चालान कापण्याऐवजी दुचाकीस्वाराला मंत्रोच्चारासह हेल्मेट घालताना दिसतोय. यावेळी पोलीस त्या व्यक्तीला हात जोडून विनंती करतो की, यापुढे हेल्मेट घालून गाडी चालवावी, पुढच्या वेळेस विना हेल्मेट आढळल्यास चारपट दंड आकारला जाईल. हा व्हिडिओ इंटरनेटवर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. अनेकदा भारतीय पोलिसांची अशी अनोखी स्टाइल सोशल मीडियावर व्हायरल होत असते. या व्हिडिओवर नेटकरी विविध प्रतिक्रिया देत आहेत.