धक्कादायक! बर्फाच्या ओझ्याने अख्खं घर पाहता पाहता कोलमडलं, व्हिडीओ व्हायरल.....

By ऑनलाइन लोकमत | Published: January 7, 2021 09:51 AM2021-01-07T09:51:27+5:302021-01-07T09:58:11+5:30

नॉर्थ इंडियात बर्फवृष्टीने थैमान घातलं आहे. बर्फवृष्टीमुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे. नेहमीच फोटो किंवा व्हिडीओत बघायला सुंदर दिसणारा बर्फ अनेकांसाठी डोकेदुखी ठरत आहे.

VIDEO : A House Collapses In Kashmir As Heavy Snowfall Takes A Toll | धक्कादायक! बर्फाच्या ओझ्याने अख्खं घर पाहता पाहता कोलमडलं, व्हिडीओ व्हायरल.....

धक्कादायक! बर्फाच्या ओझ्याने अख्खं घर पाहता पाहता कोलमडलं, व्हिडीओ व्हायरल.....

Next

आपण नेहमीच काश्मीरमध्ये होणारी बर्फवृष्टी प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे बघत असतो. हा बर्फ बघून आपण आनंदीही होतो. तेथील लोक किती नशीबवान आहेत. असाही विचार अनेकजण करतात. पण ही बर्फवृष्टी लोकांचं जगणं कठिण करून सोडते याचं एक उदाहरण समोर आलं आहे.

नॉर्थ इंडियात बर्फवृष्टीने थैमान घातलं आहे. बर्फवृष्टीमुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे. नेहमीच फोटो किंवा व्हिडीओत बघायला सुंदर दिसणारा बर्फ अनेकांसाठी डोकेदुखी ठरत आहे. काश्मीरमधील रस्ते बंद असताना बर्फाने लोकांची घरे पूर्णपणे झाकली गेली आहेत. काश्मीरच्या अनंतनाग जिल्ह्यातील एक व्हिडीओ व्हायरल झाला असून त्यात बर्फाच्या ओझ्याने एक घर पूर्णपणे कोलमडलं आहे.

ही घटना अनंतनागमध्ये बुधवारी सकाळी घडल्याचे समजते. या भागाचा संपर्क इतर शहरांपासून पूर्णपणे तुटला आहे. कारण इथे मोठ्या प्रमाणात बर्फवृष्टी झाली आहे. रस्ते, घरे, गाड्या बर्फाखाली झाकल्या गेल्या आहेत. त्यामुळे लोक हैराण झाले आहेत. 

अशात या घराचा कोलमडतानाचा व्हिडीओ समोर आला आहे. येथील नॅशनल हायवे सुद्धा काही दिवसांसाठी बंद करण्यात आला आहे. आणि वातावरण दिवसेंदिवस बिघडत आहे. 

बर्फवृष्टीत खबरदारी म्हणून श्रीनगरमधून विमान उड्डाने बंद करण्यात आली आहेत. कारण बर्फामुळे काहीच दिसत नाहीये. त्यामुळे विमान सेवा विस्कळीत झाली आहे. अनेक फ्लाइट्स कॅन्सल झाल्या आहेत. स्थानिक प्रशासनाने लोकांना केवळ अत्यावश्यक गरज असेल तरच बाहेर पडण्याची सूचना केली आहे. तसेच लोकांना खाजगी वाहनांचा वापर करण्यासही बंदी करण्यात आली आहे. कारण रस्ते पूर्णपणे बर्फाने झाकले गेलेले आहेत.
 

Web Title: VIDEO : A House Collapses In Kashmir As Heavy Snowfall Takes A Toll

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.