VIDEO : भारतातल्या ‘या’ ठिकाणी डोळे स्वच्छ करण्यासाठी वापरला जातो सेफ्टी पिन
By ऑनलाइन लोकमत | Published: January 17, 2018 05:28 PM2018-01-17T17:28:35+5:302018-01-17T17:44:38+5:30
डोळे हा शरिरातील सर्वात नाजूक अवयव असूनही त्यात एक तीक्ष्ण पिन घालण्याची हिंमत कशी होते कुणाची?
तामिळनाडू : डोळे स्वच्छ करण्यासाठी किंवा डोळ्यातील धूळ काढण्यासाठी कोणी पिनांचा वापर केलेला ऐकलंय का तुम्ही? न दुखता, न खुपता डोळ्यात सेफ्टी पिन टाकून डोळे स्वच्छ करण्याची प्रक्रिया तुम्हाला कोणी सांगितली तर कदाचित तुमचा त्यावर विश्वास बसणार नाही. कारण आपल्या शरीरातील अत्यंत नाजूक अवयवामध्ये कोणी सेफ्टी पिन कसा टाकू शकतो? आपल्या डोळ्यात आपलंच चुकून बोट गेलं तरी डोळे किती चुरचुरतात, मग सेफ्टी पिन गेलं तर काय होईल याची कल्पनाच न केलेली बरी. पण तामिळनाडूमध्ये डोळे स्वच्छ करण्यासाठी सेफ्टी पिनांचा वापर केला जातो आणि हा प्रकार तिकडे नेहमीचाच असल्याचं सांगितलं गेलंय. पाहा व्हिडीयो-
डेलिमेलने दिलेल्या वृत्तानुसार, तामिळनाडूमध्ये व्यवसायाने डोळे स्वच्छ करणारी लोकं सेफ्टी पिनांचा वापर करतात. धातूंपासून बनवलेली ही सेफ्टी पिन डोळ्याच्या एका बाजूने दुसऱ्या बाजूला फिरवली जाते. अत्यंत शिताफीने हे काम केलं जातं. समोरच्याला इजा न होता डोळे स्वच्छ केले जातात. डोळ्यात गेलेली धूळ काढण्यासाठी ही पद्धत अवलंबली जाते. डोळ्यातील बुबूळांवरही ही सेफ्टी पिन फिरवली जाते. सध्या सोशल मीडियावर असाच एक व्हिडिओ प्रचंड व्हायरल होतोय. त्या व्हिडिओमध्ये डोळे स्वच्छ करणारी व्यक्ती अत्यंत शिताफीने आपल्या ग्राहकाच्या डोळ्यात सेफ्टी पिन टाकून धूळ बाहेर काढताना दिसतेय. एक डोळा स्वच्छ झाला की लगेच दुसरा डोळा स्वच्छ केला जातो. खरंतर ही प्रक्रिया अवघ्या ५ मिनिटांची आहे. पण हा व्हिडिओ पाहतानाच आपल्या अंगावर काटे उभे राहतात, मग प्रत्यक्षात हे सारं अनुभवणं अवघडच आहे. एका चीनी महिलेनेही याप्रकारे आपले डोळे स्वच्छ केले, ती म्हणाली की मला पूर्वीपेक्षा आता जास्त स्वच्छ दिसायला लागलंय. काही लोकांना असा प्रकार अनुभवायचा आहे तर काहींना हे करण्यास भिती वाटतेय, मात्र तरीही काहींनी आपल्या भीतीवर मात करत सेफ्टी पिनांनी डोळे स्वच्छ केलेले आहेत.
आणखी वाचा - फक्त आठ मिनिटांत सोडविली २०० गणिते, मेंदूच्या विकासासाठी अबॅकस पद्धत
तामिळनाडूमध्ये डोळे स्वच्छ करण्याची ही पद्धत फार पूर्वीपासून आहे. त्यामुळे तुम्ही अशी पद्धत अवलंबू नका. हे काम अनुभवी लोकच करू शकतात. जगभरात ही पद्धत कुठेच वापरली जात नाही. केवळ भारतातच असे प्रकार दिसून येतात.